पण, या बैठकीत एकच गोंधळ उडाला. संभाजीराजे यांच्या समोरच कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. संभाजीराजे यांनी उभं राहून कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. पण, बराच वेळ हा गोंधळ सुरूच होता. कोल्हापूरमधील आंदोलनाला उदयनराजेंचा पाठिंबा दरम्यान, संभाजीराजे यांनी सोमवारी पुण्यात उदयनराजे (Udayanraje Bhosale) यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर उदयनराजे यांनी 16 तारखेला कोल्हापूरमधील आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. तसंच, मराठा आरक्षण देणे ही ठाकरे सरकारची जबाबदारी आहे, जर त्यांनी निर्णय घेतला नाहीतर उद्रेक होईल, असा इशाराही उदयनराजेंनी दिला. WTC Final: भारताविरुद्ध खेळणार ही 'टीम न्यूझीलंड', वाचा कोण झालं IN आणि कोण OUT 'आम्ही दोघे एकाच घराण्यातले आहोत. त्यामुळे इथं दोन घराण्याचा संबंध येत नाही. संभाजीराजे यांनी जे विचार मांडले त्याचाशी मी सहमत आहे. 'संभाजीराजे यांच्या आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. त्यांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा विषय आहे. पण आमचा मार्ग हा एकच आहे' असंही उदयनराजेंनी ठणकावून सांगितलं.#कोल्हापूर संभाजीराजे यांच्या बैठकीमध्ये गोंधळ pic.twitter.com/7rLQjzACXn
— News18Lokmat (@News18lokmat) June 15, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: संभाजीराजे