Maharashtra Crime News: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील शस्त्रास्त्रांसह फिरणाऱ्या आरोपीने घोरपडीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधीकोल्हापूर, 6 एप्रिल : एक अतिशय धक्कादायक अशी बातमी समोर आली आहे. एका व्यक्तीने चक्क घोरपडीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात (Sahyadri Tiger Reserve) गोठणे येथील गाभा क्षेत्रात शस्त्रास्त्रांसह फिरणाऱ्या तीन आरोपींपैकी एकाने हे घृणास्पद कृत्य केलं आहे. या प्रकरणी तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस कोठडीतील आरोपींपैकी एका आरोपीने चक्क घोरपडीवर बलात्कार (raped on Ghorpad) केल्याची धक्कादायक माहिती मोबाईल वरील रेकॉर्डवरून वनाधिकाऱ्यांना मिळाली.
वन्य प्राण्यावर अनैसर्गिक अत्याचाराची पहिलीच घटना
घोरपडीसारख्या साडेचार फूटांच्या प्राण्यासोबत संभोग करण्याचे घृणास्पद कृत्य करणाऱ्याला आता वनविभाग मानसोपचार तज्ज्ञांच्या हवाली करण्याची तयारी करत आहे. ही घटना वन गुन्ह्यातील अत्यंत दुर्मिळ घटना मानली जात आहे.
व्याघ्र गणनेसाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात लावलेल्या ट्रेप कॅमेऱ्यात 31 मार्च रोजी शस्त्रांस्त्रासह तीन आरोपी दिसून आले. त्यानंतर गुप्त माहितीच्या आधारे एका आरोपीला हातिव गावातून तर दोन आरोपींना संगमेश्वर तालुका येथून ताब्यात घेण्यात आले.
आरोपीने मोबाइलमध्ये शूट केला होता व्हिडीओ
या आरोपींच्या चौकशीत शिकाऱ्यांकडून दोन बदुंकी तसेच दोन दुचाकीही वनाधिकाऱ्यांनी जप्त केल्या आहेत. त्यावेळी आरोपींचे मोबाइल तपासल्यानंतर एका आरोपीने चक्क घोरपडीसोबतच संभोग केल्याचा रेकॉर्डेड व्हिडीओ वनाधिकाऱ्यांच्या हाती लागला.
वाचा : धक्कादायक! भाचीला गुंगीचे औषध देत मावशीने बनवला आक्षेपार्ह व्हिडीओ आणि मग...
संभोग करताना आरोपीच्या मोबाइलमधून त्याचे चित्रीकरणही केले जात होते. ती घोरपड या घृणास्पद कृत्यानंतर जिवंत राहिली का? आरोपीने इतर कोणत्या वन्यप्राण्यासोबत संभोग केला आहे का? याबाबतची चौकशी सुरु असल्याची माहिती चांदोली राष्ट्रीय उद्यानाचे विभागीय वनाधिकारी विशाल माळी यांनी दिली.
या तिन्ही शिकाऱ्यांना मिळालेली वनकोठडी 7 एप्रिल रोजी संपत आहे. परंतु चौकशीसाठी अजूनही वाव असल्याने वनाधिकाऱ्यांची टीम हा मुद्दा न्यायालयासमोर मांडणार आहे.
वन्यप्राण्यासोबत संभोग करणे ही फारच विचित्र घटना आहे. ही केस मांडताना सर्व कायदेशीर बाजू न्यायालयासमोर सादर केल्या जातील. यासाठी कायदेतज्ज्ञांची मदत घेतली जाईल अशी माहिती चांदोली राष्ट्रीय उद्यानचे विभागीय वनाधिकारी विशाल माळी यांनी दिली.
वाचा : मुलीच्या लग्नासाठी नव्हते पैसे, आईने रचलं थरारक कारस्थान; पोलिसांकडून कडक कारवाई
शिकाऱ्यांनी शिकार केलेल्या प्राण्यांचेही मोबाइलमध्ये रॅकॉर्डिंग केले. तसेच शिकार केलेल्या ससा, पॅंगोलिन, साळिंदर, पिसुरी हरिण यांचे फोटोही त्यांच्या मोबाईलमध्ये सापडले.
सात वर्षे तुरुंगवासाची तरतूद
देशातील वन्यजीवांच्या संरक्षणासाठी त्यांना विविध वर्गवारीत संरक्षण दिले जाते. वाघ आणि सिंहाप्रमाणेच घोरपड ही वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत पहिल्या वर्गवारील संरक्षित आहे. त्यामुळे घोरपडीची शिकार किंवा अवैधरित्या तस्करी करणाऱ्याला सात वर्षे सक्त तुरुंगवासाची तरतूद या कायद्यांतर्गत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.