कोल्हापूर, 2 सप्टेंबर : कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात (Bhudargad) असलेल्या मेघोली लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या भिंतीला गळती (Leakage in Megholi Irrigation Project) लागल्याची माहिती समोर आली आहे. प्रकल्पाच्या भिंतीला गळती लागून अखेर बंधारा फुटल्याची माहीती मेघोली ग्रामस्थांनी रात्री उशिरा दिली. बंधाऱ्याचे आउटलेट आहे त्या शेजारून बंधारा फुटल्याच ग्रामस्थांकडून सांगण्यात आलं आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील हा लघु पाटबंधारे प्रकल्प असून पाण्याच्या प्रवाहात सापडल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो एकर शेतजमीन वाहून गेलीय, दरम्यान या प्रकल्पातील पाण्यामुळे आता वेदगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणून वेदगंगा नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
कोरोना रुग्णसंख्या वाढली तर सप्टेंबर अखेरपर्यंत कडक निर्बंध लागू होणार
रात्री या बंधार्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी बाहेर पडल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. या गळतीमुळे संपूर्ण रात्रभर ग्रामस्थांनी जागून काढली आहे. गळती लागल्याने शेकडो एकर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे तसेच अनेक जनावरे दगावल्याचं बोललं जात आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातून 12 नद्या वाहतात त्याच प्रमाणे जिल्ह्यात विविध लघु पाटबंधारे सुद्धा बांधण्यात आले आहेत. अशाचपैकी मेघोली येथे काहीवर्षांपूर्वी एक धरण बांधलं होतं. या प्रकल्पाला गळती लागल्याची माहिती यापूर्वीच प्रशासनाला देण्यात आली होती. पावसाचा जोर वाढला आहे आणि रात्रीच्या सुमारास मातीचा बंधारा फुटला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.