Home /News /kolhapur /

Kolhapur: कोल्हापुरातील कळंबा कारागृहात कैद्याचा कारागृह अधीक्षकांवर हल्ला

Kolhapur: कोल्हापुरातील कळंबा कारागृहात कैद्याचा कारागृह अधीक्षकांवर हल्ला

कारागृह अधीक्षकांवर कैद्याचा हल्ला, कोल्हापुरातील कळंबा कारागृहातील धक्कादायक घटना

कारागृह अधीक्षकांवर कैद्याचा हल्ला, कोल्हापुरातील कळंबा कारागृहातील धक्कादायक घटना

कोल्हापुरातील कळंबा कारागृहात कैद्याने कारागृह अधीक्षकांवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.

  ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी कोल्हापूर, 27 एप्रिल : कोल्हापुरातून (Kolhapur) एक मोठी बातमी समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कळंबा मध्यवर्ती कारागृहाच्या (Kalamba Jail) अधीक्षकांवर कैद्याने हल्ला (Attack on jailer in Kolhapur) केला आहे. या हल्ल्यात कळंबा कारागृहाचे अधीक्षक चंद्रमनी इंदूरकर हे जखमी झाले आहेत. आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळच्या सुमारास कळंबा कारागृहाचे अधीक्षक चंद्रमणी इंदूरकर हे कारागृहाची पाहणी करत होते. पाहणी करत असतानाच कारागृहातील एका कैद्याने अधीक्षक चंद्रमणी इंदूरकर यांच्यावर पत्र्याच्या तुकड्याने हल्ला केला. या हल्ल्यात कारागृह अधीक्षक हे जखमी झाले आहेत. कैद्याने कारागृह अधीक्षकांवर हल्ला केल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकरणा जुना राजवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. हल्ला करणारा संशयित कैदी हा रत्नागिरीतला असून तो कळंबा कारागृहात शिक्षा भोगत आहे. काही दिवसांपूर्वी या कैद्याने दुसऱ्या कैद्यासोबत वाद घातला होता आणि त्यानंतर त्याच्यावर कारवाई झाली होती. या कारवाईचा राग मनात धरून त्याने कारागृह अधीक्षकांवर हल्ला केला अस्लयाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पाच दिवसांपूर्वी तिहार जेलमध्ये दोन गटांमध्ये तुफान राडा तिहार तुरुंगाला देशातील सर्वात मोठा आणि अति सुरक्षित तुरुंग म्हटले जाते. मात्र, याच तुरुंगात पाच दिवसांपूर्वी धक्कादायक घटना घडली. ती म्हणजे, तिहार तुरुंगात पुन्हा एकदा कैद्यांमध्ये हिंसक हाणामारी झाली. दिल्लीतील तिहार तुरुंगात कैद्यांमध्ये पुन्हा एकदा हिंसक संघर्ष सुरू झाला आहे. या हिंसक संघर्षात सुमारे 15 कैदी जखमी झाले. यातील काहींवर अजूनही उपचार सुरू आहेत. कारागृहातील कैद्यांमधील वर्चस्वाच्या लढाईत ही घटना घडली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तिहार प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, तुरुंगातील हिंसक संघर्षाची ही घटना 2 दिवसांपूर्वी घडली होती. यात कारागृह क्रमांक 8 आणि 9 मधील कैद्यांमध्ये हाणामारी झाली आणि या घटनेत 15 कैदी जखमी झाले आहेत. काही कैद्यांना प्राथमिक उपचारानंतर पुन्हा कारागृहात हलवण्यात आले आहे. तर उर्वरित जखमी कैद्यांवर कारागृहातच उपचार सुरू आहेत. कारागृह प्रशासनाने या संपूर्ण घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

  तुमच्या शहरातून (कोल्हापूर)

  Published by:Sunil Desale
  First published:

  Tags: Crime, Kolhapur

  पुढील बातम्या