Home /News /kolhapur /

जोतिबाच्या नावानं चांगभलं! बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसाचा सासणकाठी नाचवतानाचा Video Viral

जोतिबाच्या नावानं चांगभलं! बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसाचा सासणकाठी नाचवतानाचा Video Viral

दख्खनचा राजा जोतिबाची यात्रा 16 एप्रिलपासून सुरु झाली आहे. जोतिबाची चैत्र यात्रा (Jyotiba's Chaitra Yatra) नेहमीच उत्साहात होते.

  कोल्हापूर, 18 एप्रिल: दख्खनचा राजा जोतिबाची यात्रा 16 एप्रिलपासून सुरु झाली आहे. जोतिबाची चैत्र यात्रा (Jyotiba's Chaitra Yatra) नेहमीच उत्साहात होते. गेली दोन वर्ष कोरोनामुळे जोतिबा यात्रेवर निर्बंध लादले होते. यावर्षी जोतिबा यात्रेवरील सर्व निर्बंध हटवले आहेत. निर्बंध हटवल्यानंतर भाविकांनी (Devotees) प्रचंड गर्दी केली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या तीन राज्यातून भाविक जोतिबा डोंगरावर येतात. दरम्यान या यात्रेतील एक पोलिसाचा (policeman) व्हिडिओ सोशल मीडियावर (social media) व्हायरल झाला आहे. दरवर्षी यात्रेत सहा ते सात लाख भाविक दर्शनासाठी येत असतात. या यात्रेच्या बंदोबस्तासाठी पोलीस बंदोबस्त ही मोठा तैनात करण्यात येतो. यातले बरेच पोलीस हे जोतिबाचे भक्त असतात. त्यामुळे बंदोबस्तासोबतच तेही या यात्रेचा आनंद घेत असतात. अशाच एका पोलिसाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. शनिवारी झालेल्या यात्रेत एका पोलिसानं जोतिबाची सासणकाठी नाचवली आहे. ही सासणकाठी नाचवतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. सकाळचे संपादक सम्राट फडणीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. मोठा पोलीस बंदोबस्त चैत्र यात्रेसाठी 2 पोलिस अप्पर अधिकारी, 5 उपअधीक्षक, 130 पोलीस अधिकारी, 900 पोलीस, 700 होमगार्ड तसंच सेवाभावी संस्थांचाही बंदोबस्त तैनात आहे. डोंगरावर ही कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.

  तुमच्या शहरातून (कोल्हापूर)

  Published by:Pooja Vichare
  First published:

  Tags: Kolhapur

  पुढील बातम्या