गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीला नवे वळण, महाडिक कुटुंबातील सदस्य पहिल्यांदाच संचालकपदी!

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीला नवे वळण, महाडिक कुटुंबातील सदस्य पहिल्यांदाच संचालकपदी!

सत्ताधारी गटाच्या महाडिक गटाकडून शौमिका महाडिक या विजयी झाल्या आहेत.

  • Share this:

कोल्हापूर, 04 एप्रिल:  संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या गोकुळ दूध संघाच्या (Gokul Dudh Sangh elections) निवडणुकीचे निकाल आता हाती येत आहे. विरोधी गटाने विजयाचा गुलाल उधळल्यानंतर आता सत्ताधारी महाडिक (Mahadik) गटाने बाजी मारली आहे. महाडिक गटाकडून शौमिका महाडिक या विजयी झाल्या आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur District) आर्थिक सत्ताकेंद्र असलेल्या जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच  दूध संघासाठी मतमोजणी सुरू आहे.

महिला गटातून विरोधी गटाच्या अंजना रेडेकर विजयी झाल्या आहेत तर सत्ताधारी गटाच्या महाडिक गटाकडून शौमिका महाडिक या विजयी झाल्या आहेत. त्यामुळे महाडिक कुटुंबियात पहिल्यांदाच गोकुळचे संचालक पद मिळाले आहे.

सांगलीत 8 दिवसांचा कडक लॉकडाऊन, जयंत पाटलांची घोषणा

तर सत्ताधारी गटाला धक्का देत विरोधी गटातील आरक्षण असलेल्या गटातील तीन उमेदवार निवडून आले आहेत. माजी आमदार सुजित मिणचेकर, अमर पाटील आणि बयाजी शेळके हे तीन उमेदवार निवडून आले आहेत.

सर्वसाधारण गटाची मतमोजणी थोड्याच वेळात सुरू होणार आहे. गोकुळ दूध संघावर अनेक वर्ष महाडिक गटाची सत्ता आहे. मात्र, त्यांना शह देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील मंत्री हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी एकत्र येऊन विरोधी आघाडी स्थापन केली आहे. त्यामुळे मतदार कुणाला कौल देणार हे संध्याकाळी निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

IPL BREAKING: IPL 2021 रद्द, BCCI उपाध्यक्ष राजीव शुक्लांची माहिती

या निवडणुकीच्या निमित्ताने माजी आमदार महादेवराव महाडिक, आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या विरोधात कोल्हापूर जिल्ह्यातील 3 मंत्री म्हणजेच हसन मुश्रीफ, सतेज पाटील आणि राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासह पाच आमदारांचीची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यामुळे सत्ताधारी गड राखणार की सत्तांतर होणार हे पाहणं महत्त्वाचे आहे.

Published by: sachin Salve
First published: May 4, 2021, 1:55 PM IST
Tags: kolhapur

ताज्या बातम्या