Home /News /kolhapur /

Kolhapur election : 'ये दोस्ती...' म्हणत महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या जल्लोष, VIDEO

Kolhapur election : 'ये दोस्ती...' म्हणत महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या जल्लोष, VIDEO

सतेज पाटील, हसन मुश्रीफ आणि संजय मंडलीक यांनी तर 'ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे' असं गाणं म्हणत एकच जल्लोष केला.

  कोल्हापूर, 16 एप्रिल : उत्तर कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीत (North Kolhapur Assembly By election) महाविकास आघाडीने दमदार विजय मिळवून भाजपला सातवे आसमान दाखवले आहे. महाविकास आघाडीचे नेते सतेज पाटील, हसन मुश्रीफ आणि संजय मंडलीक यांनी तर 'ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे' असं गाणं म्हणत एकच जल्लोष केला. कोल्हापूर पोटनिवडणूक जिंकल्यानंतर सतेज पाटील, हसन मुश्रीफ, संजय मंडलीक यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन विजयाचे श्रेय कार्यकर्त्यांना दिलं. यावेळी तिन्ही नेत्यांनी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी 'ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे' गाणं गात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यानी सतेज पाटील, हसन मुश्रीफ, संजय मंडलीक, मालोजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत एकच जल्लोष केला. कोल्हापूरच्या पोट निवडणुकीत काँग्रेसचा झालेला विजय हा काँग्रेसला ऊर्जा देणारा  तर भाजपसाठी चिंता व्यक्त करणारा आहे.या निवडणुकीत भाजपचे मताधिक्य वाढले असले तरी त्यांचा पराभवही मोठ्या फरकाने झाला आहे. भाजपचे हिंदुत्वाचे कार्ड या निवडणुकीत साफ खोटे ठरले तर महाविकास आघाडी आणखी घट्ट झाल्याचे दिसून आले.त्यामुळे आगामी महानगरपालिकांची लिटमस टेस्ट समजल्या जाणाऱ्या या पोटनिवडणुकीच्या निकालाने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. (बिलकिस बानो यांच्या निधनानंतर संपूर्ण पाकिस्तान शोकाकुल,भारताशी आहे खास कनेक्शन ) कोल्हापूरच्या या पोटनिवडणुकीत जिंकायचेच या इराद्याने भाजपने फिल्डिंग लावली होती. नुकत्याच झालेल्या चार राज्यातील निवडणुकीत मिळालेल्या यशाने आत्मविश्वास दुणावलेल्या भाजपने ही पोटनिवडणुक बिनविरोध होऊ दिली नाही. तसा भाजपवर आरोपही होत आहे. बिनविरोध ऐवजी याच निकलांच्या धर्तीवर या पोटनिवडणुकीतही विजय निश्चित मानून भाजपने काम सुरू केले. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. तर दुसऱ्या बाजूला पालकमंत्री सतेज पाटील यांनीही दिवंगत चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री याना उमेदवारी देऊन त्यांना निवडून आणण्याचा चंग बांधला. 'अण्णांच्या माघारी,आता आपली जबाबदारी' म्हणत त्यांनी कोल्हापूरकराना साद घातली होती. मुख्यमंत्र्यांसह अनेक नेते या प्रचारात विविध पातळीवरून उतरले होते.यात झालेल्या आरोप प्रत्यारोपात हिंदुत्व विरुद्ध पुरोगामीत्व या पातळीवर गेलेल्या या निवडणुकीत अखेर काँग्रेसने यश मिळवत भाजपचे हिंदुत्वाचे कार्ड फेल ठरवले. सतेज पाटील यांनी जनतेने भाजपला साफ नाकारल्याचे म्हणत टीकास्त्र सोडलं.

  तुमच्या शहरातून (कोल्हापूर)

  Published by:sachin Salve
  First published:

  Tags: Chandrakant patil

  पुढील बातम्या