Home /News /kolhapur /

इमारतीची भिंत पाडत होते आणि तो खाली उभा होता, मग झालं असं की... पाहा LIVE VIDEO

इमारतीची भिंत पाडत होते आणि तो खाली उभा होता, मग झालं असं की... पाहा LIVE VIDEO

Kolhapur News: इमारतीची भिंत पाडत असताना निष्काळजीपणा जिवावर बेतला असता. धोकादायक इमारतीची भिंत कोसळतानाच व्हिडीओ समोर आला आहे.

    कोल्हापूर, 14 जुलै : पावसाळ्यात इमारत कोसळण्याच्या अनेकदा दुर्घटना घडल्याचं आपण ऐकतो, पाहतो. अशाच धोकादायक इमारती रिकाम्या करुन त्या पाडण्याचे काम कोल्हापूर शहरात (Kolhapur City) घेण्यात आले होते. मात्र, यावेळी खबरदारी न घेता इमारतीची भिंत (Building wall) पाडत असल्याचं पहायला मिळालं आणि हाच निष्काळजीपणा नागरिकांच्या जीवावर बेतला असता. इमारतीची भिंत पाडतानाच्या घटनेचा व्हिडीओ (wall collapsed incident caught in Camera) समोर आला आहे. कोल्हापूर शहरातील महद्वार रोडवर ही धोकादायक इमारत होती. इमारत धोकादायक असल्याने ती पाडण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र, इमारतीची भिंत पाडत असताना योग्य ती काळजी घेतली नसल्याचं लक्षात येत आहे. धोकादायक इमारतीच्या वरील भाग तोडण्यात येत होता. यावेळी भिंत कोसळली आणि एक जण सुदैवाने बचावला आहे. VIDEO: नागपुरात ज्वेलर्सवर दरोडा; लुटीचा थरार सीसीटीव्हीत कैद, पाहा धक्कादायक CCTV इमारतीची भिंत पाडतानाची ही घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. केवळ दैव बलवत्तर म्हणून हा इसम थोडक्यात बचावला आहे. या घटनेतून शिकण्यासारखे खूप काही आहे. योग्य ती काळजी आणि खबरदारी घेऊन अशा प्रकारे कामे केल्यास कुणालाही दुखापत किंवा जिवीतहानी होणार नाही. उल्हासनगरमध्ये स्लॅब कोसळला मंगळवारी उल्हासनगरमध्ये कॅम्प नंबर एक च्या 'ए 'ब्लॉक परिसरात असलेल्या देवऋषी या इमारतीत ही दुर्घटना घडलीय. तळमजल्यावर सिलिंगचे काम सुरू होतं, याच दरम्यान ही दुर्घटना घडलीय. या घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर महापालिका उपायुक्त, सहाय्यक आयुक्त यांनी घटनास्थळी येत कर्मचाऱ्यांच्या मदतीने इमारतीमधील लोकांना बाहेर काढून इमारत रिकामी केली आहे. दरम्यान गेल्या दोन महिन्यात उल्हासनगर शहरात स्लॅब कोसळल्याची ही तिसरी दुर्घटना असून यापूर्वीच्या दोन घटनेत बारा लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Kolhapur

    पुढील बातम्या