Home /News /kolhapur /

मागास आयोगामध्ये मराठा समाजाला प्रतिनिधित्व कसं नाही? समरजितसिंह घाटगेंचा सरकारला सवाल

मागास आयोगामध्ये मराठा समाजाला प्रतिनिधित्व कसं नाही? समरजितसिंह घाटगेंचा सरकारला सवाल

मराठा आरक्षण संदर्भात राज्य सरकारने जो मागास आयोग स्थापन केला आहे, त्यावर शाहू जनक घराण्याचे वंशज समरजितसिंह घाटगे (Samarjitsinh Ghatge) यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कोल्हापूर, 13 जून : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) प्रश्नावरून राज्यात सध्या तणावाचे वातावरण आहे. मराठा आरक्षण संदर्भात राज्य सरकारने जो मागास आयोग स्थापन केला आहे, त्यावर शाहू जनक घराण्याचे वंशज समरजितसिंह घाटगे (Samarjitsinh Ghatge) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यामध्ये मराठा समाजाला तातडीनं प्रतिनिधीत्व द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. या आयोगात मराठा समाजाचा एकही प्रतिनिधी नसल्याने त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सरकारने या आयोगामध्ये तातडीने मराठा समाजातील व्यक्तीला प्रतिनिधित्व दिलं पाहिजे, असं म्हंटले आहे. एकीकडे सरकार शाहु-फुले-आंबेडकर आणि पुरोगामी विचारानं काम करत असल्याचे सांगत असते आणि दुसरीकडे एका समाजाला प्रतिनिधीत्व देत नाही, असा विरोधाभास कसा? आयोगात मराठा समाजातील व्यक्तीला स्थान नसल्यानं मराठा समाजाचा अपेक्षा भंग होईल असेही ते म्हणाले. याबाबत त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मागास आयोग स्थापन केला. राज्यातील सरकार शाहु-फुले-आंबेडकर यांच्या विचाराने, पुरोगामी विचाराने चाललं आहे, असे सांगत असले तरी समाजातील सर्व घटकांना या आयोगामध्ये स्थान मिळत नसल्याचे दिसत आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी स्थापन केलेल्या आयोगामध्ये मराठा प्रतिनिधी नसल्याचे समरजीत सिंह यांनी सांगितले. सरकारने तातडीने या आयोगात मराठा समाजाला प्रतिनिधित्व दिलं पाहिजे, नाहीतर या समाजाचा मोठा अपेक्षाभंग होईल. हे वाचा - “मोर्चा काढून काय निष्पन्न होणार? संसदेत विषय उचलून धरावा लागेल”: अशोक चव्हाण मराठा आरक्षण प्रश्नावरून गेल्या काही दिवसांपासून राजकारण चांगलचं तापल्याचं दिसून येत आहे. मराठा आरक्षणावरू खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक असताना आता शाहू जनक घराण्याचे वंशज समरजितसिंह घाटगे यांनीही आपली मागास आयोगाबाबतची भूमिका मांडली आहे. मागास आयोगामध्ये मराठा समाजाला प्रतिनिधीत्व नसल्यावरून त्यांनी राज्य सरकारला इशारा दिला असून तातडीनं या आयोगात मराठा समाजाला प्रतिनिधीत्व द्यावे, असं त्यांनी राज्य सरकारला सांगितलं आहे.
Published by:News18 Desk
First published:

Tags: Maratha, Maratha reservation

पुढील बातम्या