Home /News /kolhapur /

Kolhapur by election: कोल्हापुरातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या करुणा शर्मांची संपत्ती किती माहितीये का?

Kolhapur by election: कोल्हापुरातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या करुणा शर्मांची संपत्ती किती माहितीये का?

कोल्हापुरातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या करुणा शर्मा कोट्यधीश, वाचा किती आहे संपत्ती

कोल्हापुरातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या करुणा शर्मा कोट्यधीश, वाचा किती आहे संपत्ती

कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत करुणा शर्मा यांनी आपला अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांनी आपल्याकडे नेमकी किती संपत्ती आहे याची माहिती दिली आहे.

    ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी कोल्हापूर, 24 मार्च : काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुक (Kolhapur North by election) आता काही दिवसांवर आली आहे. या निवडणुकीत अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. या निवडणुकीच्या रिंगणात करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनीही उडी घेतली आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी करुणा शर्मा यांनी आपला अर्ज दाखल केला. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केल्यानंतर करुणा शर्मा चर्चेत आल्या होत्या. आज त्यांनी आपला अर्ज दाखल करताना आपल्या संपत्तीची माहितीही जाहीर केली आहे. करुणा शर्मा यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची नेमकी किती संपत्ती आहे याची माहिती देण्यात आली आहे. या माहितीनुसार, करुणा शर्मा यांच्याकडे कोट्यावधींची मालमत्ता असल्याचं दिसून येत आहे. करुणा शर्मा यांनी आपला अर्ज दाखल करताना धनंजय मुंडे यांच्या पत्नी असा उल्लेख केला आहे. आपल्या प्रतिज्ञापत्रात करुणा धनंजय मुंडे यांनी आपल्याकडे रोख 400000 रुपये असल्याचं म्हटलं आहे. तर विविध बँक अकाऊंट आणि इतर गुंतवणुकीची एकूण रक्कम पाहता कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे. वाचा : विंदा करंदीकरांच्या कवितेतून देवेंद्र फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका, म्हणाले... तर मध्यप्रदेशात इंदूर येथे बिगरशेती जमीन असून त्याचे एकूण आकारमान 2400 चौरस फूट इतके असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. या जागेवर झालेल्या बांधकामानंतर त्या जागेची बाजारभावानुसार किंमत ही 2,00,00,000 रुपये इतकी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यासोबतच मुंबईत असलेल्या फ्लॅटचाही उल्लेख केला आहे ज्याची किंमतही कोट्यवधी रुपयांच्या घरात असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीच्या अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे. करुणा शर्मा मुंडे यांनी शिवशक्ती सेनेतर्फे स्वतः रिंगणात उतरणार अशी घोषणा केली होती. आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र, त्यांच्या नावबाबत तांत्रिक मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता आहे. याबाबत त्यांना विचारणा केली असता, 'माझ्याकडे सर्व कायदेशीर पुरावे आहे. उलट धनंजय मुंडे यांनी सहा-सहा मुले आणि अनेक पत्नी लपवल्या आहे. करुणा आणि धनंजय यांची प्रेमकहाणी मराठीत येणार आहे. त्यावर काम सुरू आहे. त्यामुळे त्यांना आता अर्ज भरण्यासाठी तांत्रिक अडचणी येणार आहेत. माझ्याकडे सर्व कायदेशीर पुरावे आहेत. त्यामुळे अर्ज करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही, असा खुलासाच करुणा शर्मा यांनी केला. वाचा : "सोलापुरातही एक सचिन वाझे, लाखोंची वसुली करतो" देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट यापूर्वी आमच्या दोघांवर सिनेमा काढल्यावर तो हिट होईल असे वक्तव्य त्यांनी केले होते तर आज आमच्या प्रेम-कहाणीवरचे पुस्तक अंतिम टप्यात असून त्यातून अनेक पुरावे समोर आणणार असल्याचे शर्मा यांनी स्पष्ट केलं. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 12 एप्रिलला मतदान तर 16 एप्रिलला मतमोजणी केली जाणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 24 मार्च ही शेवटची तारीख आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Election, Kolhapur

    पुढील बातम्या