कोल्हापूर, 05 एप्रिल: यावर्षीही दख्खनच्या राजाची यात्रा (Jotiba Yatra 2021) रद्द होण्याची शक्यता आहे. सरकारने कडक निर्बंध लागू केल्यानंतर हा निर्णय घेतला जाऊ शकतो. यामुळे सलग दुसऱ्या वर्षी जोतिबाची चैत्र यात्रा रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्यावर्षीही कोरोनाच्या (Coronavirus Pandemic) संकटामुळे ही यात्रा रद्द करण्यात आली होती, याहीवर्षी कोरोनाचं सावट कायम आहे.
17 एप्रिल रोजी ही यात्रा असणार आहे, मात्र महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. ते लक्षात घेता यावर्षीही जोतिबाची चैत्र यात्रा रद्द होऊ शकते. दरम्यान जिल्हा प्रशासन आणि देवस्थान समिती लवकरच याबाबत त्यांची भूमिका जाहीर करती. गेल्यावर्षी ही यात्रा लॉकडाऊनमुळे रद्द झाली होती. दरवर्षी लाखो भाविक याठिकाणी दाखल होतात.
कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी गेल्यावर्षी लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्या दरम्यान असणारी श्री क्षेत्र जोतिबा डोंगरची चैत्र यात्रा रद्द करण्यात आली होती.
(हे वाचा-मुख्यमंत्र्यांची नैतिकता कुठं गेली? नितेश राणेंची टीका)
या यात्रेसाठी साधारण 8-9 लाख भाविक जोतिबा डोंगरावर येतात. मात्र ही यात्रा रद्द झाल्याने कोट्यवधी रुपयांचा फटका बसला होता. यावर्षीही या यात्रेवर कोरोनाचे संकट आहे. पुजारी, ग्रामस्थ, भाविक यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते, पण कोरोनाच्या पार्श्वभूमिवर यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. कामदा एकादशीला सुरू होणारी ही यात्रा गाव भंडारा झाल्यानंतर समाप्त होते. गेल्यावर्षी पहिल्यांदा जोतिबा यात्रा रद्द झाली होती. त्यामुळे भाविकांचा हिरमोड झाला होता. यंदा पालखी सोहळा तरी होईल अशी भाविकांची अपेक्षा आहे. मात्र आजपासून अनेक देवस्थानं बंद होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे जोतिबाची यात्री होण्याची शक्यता सध्या तरी कमीच आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.