महाराष्ट्र हादरला! कोल्हापूरात अवैध गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश, अंनिसच्या स्टिंगमधून डॉक्टरांची नावं आली समोर
महाराष्ट्र हादरला! कोल्हापूरात अवैध गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश, अंनिसच्या स्टिंगमधून डॉक्टरांची नावं आली समोर
प्रातिनिधिक फोटो
काही वर्षांपूर्वी सांगली येथून स्त्री भृण हत्या केल्याचं जात असल्याचं समोर आलं होतं. यामुळे अख्खा महाराष्ट्र हादरला होता. यानंतर कोल्हापूरातील अवैध गर्भपाताच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे.
कोल्हापूर, 7 एप्रिल : कोल्हापूरातील (Kolhapur News) मोठी बातमी समोर आली आहे. येथे सुरू असलेला अवैध गर्भपाताच्या रॅकेटचा पर्दाफाश (Illegal abortion racket exposed) करण्यात आल्याची माहिती उघडकीस आली आहे. पन्हाळा तालुक्यातील पडळ येथे हा प्रकार घडला. अंधश्रद्धा निर्मुलन समितीने स्टिंग करून हा प्रकार सर्वांच्या समोर आणला.
काय आहे प्रकरण?
कोल्हापूरातील जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात अवैधपणे गर्भपात होत असल्याची माहिती अंधश्रद्धा निर्मुलन समितीला मिळाली होती. यानंतर समितीने स्टिंग करून हा प्रकार उघडकीस आणला. अंनिसने पोलिसांच्या मदतीने येथे छापा टाकला. यावेळी गर्भपातासाठी लागणारा मोठा साठा हाती लागला. हा सर्व प्रकार पाहून पोलिसांनाही धक्का बसला.
हे ही वाचा-यात्रेतील खेळणं ठरलं संसाराच्या सत्यानाशाचं कारण, कोल्हापुरात विवाहितेनं मध्यरात्री उचललं भयावह पाऊलहाती आलेल्या माहितीनुसार, उमेश पोवार, हर्षल नाईक सोबत आणखी काही आरोग्य कर्मचारी परवानगी नसतानाही गर्भपात करत असल्याची माहिती समोर आली. गर्भपातासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह गोव्यातूनही अनेक जणं येथे गर्भपातासाठी येत असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणात पन्हाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
2017 मध्ये सांगली येथून स्त्री भृण हत्या केल्याचं जात असल्याचं समोर आलं होतं. यामुळे अख्खा महाराष्ट्र हादरला होता. यानंतर कोल्हापूरातील अवैध गर्भपाताच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.