चंद्रकांत पाटलांवर टीका करताना राष्ट्रवादीच्या नेत्याची जीभ घसरली

चंद्रकांत पाटलांवर टीका करताना राष्ट्रवादीच्या नेत्याची जीभ घसरली

चंद्रकांत पाटलांबाबत राग व्यक्त करताना मुश्रीफ यांची जीभ घसरली आहे.

  • Share this:

कोल्हापूर, 04 एप्रिल : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या आजारपणाबाबत भाजपचे आयटी सेलचे प्रमुख नवीन कुमार जिंदल यांनी आक्षेपार्ह टीका केली. त्यावर भाजपने माफी मागावी अशी मागणी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली होती. आता या प्रकरणी भाजपचे प्रदेशाध्यश्र चंद्रकांत पाटलांवर टीका करताना हसन मुश्रीफ यांची जीभ घसरली आहे. चंद्रकांत पाटलांबाबत राग व्यक्त करताना मुश्रीफ यांची जीभ घसरली आहे. पाटील यांना 'एवढी मस्ती कुठून आली' असं वक्तव्य मुश्रीफ यांनी केलं आहे.

भाजप मीडिया सेलचे प्रमुख नवीन जिंदल यांनी शरद पवारांच्या आजारपणाबाबत टीका केली होती. सचिन वाझे यांनी एनआयएला असं काय सांगितलं की, पवारांच्या पोटात दुखायला लागलं, असं ट्वीट जिंदल यांनी केलं होतं. तसंच पवार यांची ही पोटदुखी पाहता, पश्चिम बंगालच्या आधी महाराष्ट्रातच सत्तांतर होईल, असं त्यांनी म्हटलं होतं. जिंदल यांच्या या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी संताप व्यक्त केला होता. राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनीही नवीन कुमार जिंदल यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल भाजपने माफी मागावी अशी मागणी केली होती.

वाचा - '2 दिवसात माफी मागा अन्यथा...', हसन मुश्रीफ यांचा भाजपला अल्टिमेटम

याच मुद्द्यावरून हसन मुश्रीफ यांची जीभ घसरली आणि त्यांनी चंद्रकांत पाटलांबाबत हे वक्तव्य केलं आहे. मीडिया सेल प्रमुखाच्या पवारांवरील वक्तव्यावर माफी मागावी म्हटलं, तर यात चुकलं काय असा सवाल करत, चंद्रकांत पाटलांना एवढी मस्ती कुठून आली असं वक्तव्य मुश्रीफ यांनी केलं. यावेळी चंद्रकांत पाटलांवर इतरही अनेक मुद्द्यांना धरून त्यांनी टीका केली. चंद्रकांत पाटील भित्रा माणूस असून, त्याची लायकी नाही असंही मुश्रीफ म्हणाले. कोल्हापुरात एकाही विधानसभेतू ते उभे राहू शकले नाही. त्यांना  कोल्हापुरातून पळून जावं लागलं, पुण्यात महिलेच्या जागेवर उभं राहावं लागतं यावरुन त्याची लोकप्रियता कळते, अशा शब्दांत मुश्रीफ यांनी त्यांचा संताप व्यक्त केला. गेल्या मंत्रिमंडळात अपघातानेच पाटलांना दोन नंबरचे स्थान मिळालं, असंही त्यांनी म्हटलं.

Published by: News18 Desk
First published: April 4, 2021, 5:13 PM IST

ताज्या बातम्या