कोल्हापूर, 15 एप्रिल : एकीकडे पेट्रोल डिझेलसह खाद्य तेलाचे दर गगनाला भिडले आहे. महागाईच्या महामारीत सर्वसामान्य जनता होरपळून निघाले आहे. आता पुन्हा एकदा सकाळच्या चहा आणखी महागणार आहे. गोकूळ दूध संघाने दुधाच्या (gokul milk price hike) दरामध्ये 4 रुपयांनी वाढ केली आहे.
गोकूळ संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये गोकूळ दुधाच्या दरात 4 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. म्हैशीच्या दूध विक्री दारात लिटरमागे 4 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे आता एक लिटर दुधासाठी 58 रुपये मोजावे लागणार आहे. ही दरवाढ शनिवारपासून लागू होणार आहे.
दरम्यान, मागील मार्चच्या पहिल्या आठवड्यातच अमूल (Amul), पराग (Parag) आणि नंतर मदर डेअरीने (Mother Dairy) दुधाचे दर लिटरमागे दोन रुपयांनी वाढवले होते. मध्य प्रदेशातल्या सांची या कंपनीने दुधाच्या दरात लिटरमागे पाच रुपयांची वाढ केली आहे. दूध हा रोजच्या वापरातला अविभाज्य घटक आहे. त्यामुळे अचानक झालेल्या या दरवाढीमुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसला आहे.
(लग्नानंतर आलिया भट्टचा मराठमोळ्या बॉडीगार्डही भावुक; आठवणीत शेअर केला हा Photo)
तर त्यानंतर गोवर्धन दूध अर्थात डेअरी फर्म पराग मिल्क फूड्स लिमिटेडने (Parag Milk Foods Ltd) सुद्धा गोवर्धन ब्रँडच्या गायीच्या दुधाच्या दरात लिटरमागे 2 रुपयांनी वाढ केली. गोवर्धन गोल्ड मिल्कचा (Gowardhan Gold Milk) दर आता 48 रुपयांवरून 50 रुपये झाला आहे. टोन्ड व्हरायटीसह गोवर्धन फ्रेशचा (Gowardhan fresh) भाव 46 रुपयांवरून 48 रुपयांवर पोहोचला आहे. पराग मिल्क फूड्स लिमिटेडने मंगळवारी सांगितले की, वाढत्या किमतीमुळे दरात 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. नवे दर 1 मार्चपासून लागू झाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.