मराठी बातम्या /बातम्या /kolhapur /

महापुराचा राज्याला जबरदस्त फटका; तब्बल 4000 कोटींचं नुकसान, 209 जणांचा बळी

महापुराचा राज्याला जबरदस्त फटका; तब्बल 4000 कोटींचं नुकसान, 209 जणांचा बळी

गेल्या आठवड्यात कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह कोकणात आलेल्या महापुरामुळे लाखो रुपायांचं नुकसान झालं आहे. तर 200 हून अधिक जणांनी आपला प्राण गमावला आहे

गेल्या आठवड्यात कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह कोकणात आलेल्या महापुरामुळे लाखो रुपायांचं नुकसान झालं आहे. तर 200 हून अधिक जणांनी आपला प्राण गमावला आहे

गेल्या आठवड्यात कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह कोकणात आलेल्या महापुरामुळे लाखो रुपायांचं नुकसान झालं आहे. तर 200 हून अधिक जणांनी आपला प्राण गमावला आहे

  • Published by:  News18 Desk

कोल्हापूर, 28 जुलै: गेल्या आठवड्यात कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह कोकणाला अतिवृष्टीनं (Heavy Rainfall) जोरदार झोडपून काढलं आहे. एकाच दिवशी कोकणात तब्बल 13 ठिकाणी झालेल्या ढगफुटीमुळे (Cloudburst) रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि काही प्रमाणात सातारा जिल्ह्यात पुरपरिस्थिती (Flood) निर्माण झाली होती. पुराच्या पावसामुळे अनेकाचं संसार उद्धवस्त झाले आहेत. तर बऱ्याच जणांना राहायला घराच छतही उरलं नाही. दरड कोसळल्यानं राज्यात तब्बल 209 जणांनी आपला जीव गमावला (Deaths) आहे. आणखी बरेच जण बेपत्ता आहेत. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे आतापर्यंत राज्यातील 209 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 25 हजाराहून अधिक जनावरं दगावली आहेत. एकूण मालमत्तेचं झालेल्या नुकसानीचा आकडा तर आणखी भीतीदायक आहे. गेल्या आठवड्यात आलेल्या पावसामुळे राज्यात तब्बल 4000 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. बाधित लोकांना मदत करण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून आज मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा-लसीकरणासाठी वृद्धांची होरपळ; पहाटेपासून रांगा लावूनही लस मिळेना, पाहा VIDEO

काही दिवसांपूर्वीच कोकणाला तौत्के चक्रीवादळाचा फटका बसला होता. त्यातून कोकणवासी सावरले नाहीत. तोपर्यंत अतिवृष्टीनं कोकणात मृत्यूतांडव केला आहे. नागरिकांच्या शेतीसोबतच घराचं, व्यवसायाचं, दुकानांचं प्रचंड नुकसान झालं आहे. सद्यस्थितीत राज्यात NDRF च्या 16 टीम आणि भारतीय लष्कराच्या 3 टीम बचाव कार्य करत आहेत. तसेच राज्यात 308 निवारा केंद्र उभारले असून याठिकाणी 2 लाखाहून अधिक लोकं निवारा घेत आहेत. सुरक्षित स्थलांतर झालेल्या नागरिकांची संख्या जवळपास 4 लाख 34 हजार इतकी आहे.

हेही वाचा-Breaking News: लवकरच महाराष्ट्र राज्यातील लॉकडाऊन उठणार?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मंत्र्यांसोबत नुकसान भरपाईच्या पॅकेजबद्दल चर्चा करण्यात आली आहे. आज याबाबतचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. कोणत्याही वेळी याबाबत मुख्यमंत्री घोषणा करू शकतात. पूरग्रस्त जिल्ह्यांतील व्यापारी आणि दुकानदारांसह छोट्या-मोठ्या उद्योगांनाही सरकारकडून मदत जाहीर केली जाऊ शकते. 2019 साली आलेल्या पुराचा देखील जबरदस्त फटका कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला बसला होता. त्यावेळी तत्कालीन सरकारकडून 700 कोटींची मदत केली होती.

First published:

Tags: Kolhapur, Konkan, Rain flood, Sangli