कोरोनाच्या संकटात शोधली संधी, चिमुरड्याला सव्वा दोनशे राजधान्या तोंडपाठ

कोरोनाच्या संकटात शोधली संधी, चिमुरड्याला सव्वा दोनशे राजधान्या तोंडपाठ

मुलांना संस्कार घरातूनच मिळतात हे आपण ऐकत पाहात आलो आहोत. मुले घरातच बसून आहेत, काय करणार म्हणून त्यांच्या हातात मोबाईल देऊन त्यांना शांत करणारे पालकही असतात. पण तसं न करता मुलांसाठी वेळ काढून त्यांना वेगवेगळ्या उपक्रमात गुंतवल्यास, या संकटकाळातही शिकण्याची चांगली संधी गवसल्याशिवाय राहणार नाही.

  • Share this:

कोल्हापूर, 12 एप्रिल: कोरोनाच्या संकटात सर्वांनाच कठीण काळाला सामोरं जावं लागलं. शालेय विद्यार्थ्यांचंही काहीसं तसंच आहे. शाळेला सुट्टी काही दिवस छान वाटते. पण मुलांना आता घरी राहूनही कंटाळा आलाय. सारखं घरात राहून करायचं काय? या त्यांच्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नसतं. पण कोल्हापूरच्या अजिंक्यच्या पालकांनी त्याला या प्रश्नाचं उत्तर दिलं आणि त्याचा फायदा म्हणजे, त्याला आज जगातल्या बहुतांश देशांच्या राजधान्यांची नावं तोंडपाठ आहेत. विशेष म्हणजे अजिंक्यचं वय आहे अवघं साडे पाच वर्ष.

(वाचा - लाखोंमध्ये एखादीच होते अशी गडबड;2 लाख रुपयांत विकला गेला अनोख्या डिझाईनचा iPhone)

अंजिंक्य अरुण मोरबाळे हा कोल्हापूरच्या कागल तालुक्यातल्या शिंदेवाडी गावातील आहे. इतर सर्व लहान मुलांप्रमाणे अजिंक्यचाही दिनक्रम ठरलेला होता. शाळा, खेळणे आणि अभ्यास. वय कमी असल्यानं खेळण्या बागडण्यातच अधिक वेळ जायचा. पण कोरोना आला आणि मुलं जणू अक्षरशः घरात कोंडली गेली. घरी बसून मुलं ऑनलाईन वर्गामध्ये सहभागी झाले. पण तरीही उरलेला पूर्ण वेळ घरात बसून मुलं बोर होऊ लागली होती. सारखं घरात बसून काय करायचं असा सर्वांसारखाच प्रश्न मग अजिंक्यला आणि त्याच्या पालकांनाही पडला.

(वाचा - भारतात दिली जाणार रशियन कोरोना लस; Sputnik V ला हिरवा कंदील)

मनात मुलाला कशात गुंतवायचे हा विचार असतानाच अजिंक्यच्या कुटुंबियांनी यूट्यूबवरचा एक व्हिडीओ पाहिला. छत्तीसगडच्या एका मुलीचा हा व्हिडीओ होता. या मुलीने जगभरातील देशांच्या राजधानी कोणत्या आहेत हे पाठ केलं होतं. जवळपास दीडशे देशांच्या राजधान्यांची नावं तिला तोंडपाठ होती. त्यातून प्रेरणा घेत अजिंक्यच्या कुटुंबियांनी त्यालाही असं काही शिकवायचं ठरवलं. अजिंक्यनेही त्यात रस दाखवला. त्यामुळे त्याच्या आईने एका डायरीमध्ये जगातील 231 पैकी 181 देश आणि भारतातील 29 राज्ये यांच्यासह त्यांच्या राजधान्यांची नावं लिहिली. अजिंक्यनेही आवडीनं याचं पाठांतर सुरू केलं.

सुरुवातीला त्याला काहीसं अवघड गेलं, पण नंतर त्याला यातही गंमत वाटली आणि पाहता पाहता काही दिवसांत त्यानं हे तोंडी पाठ केलं. तीन महिन्यांच्या अथक परीश्रमानंतर अजिंक्यला हे सर्व पाठ झालं. आता अजिंक्यला तुम्ही जगातील कुठल्याही देशाचं नाव सांगा तो पटकन तिथली राजधानी कोणती ते सांगतो.

five and half year old boy from kolhapur have knowlege of capitals of countries worldwide मुलांना संस्कार घरातूनच मिळतात हे आपण ऐकत पाहात आलो आहोत. मुलं घरातच बसून आहेत, काय करणार म्हणून त्यांच्या हातात मोबाईल देऊन त्यांना शांत करणारे पालकही असतात. पण तसं न करता मुलांसाठी वेळ काढून त्यांना वेगवेगळ्या उपक्रमात गुंतवल्यास, या संकटकाळातही शिकण्याची चांगली संधी गवसल्याशिवाय राहणार नाही.

Published by: News18 Desk
First published: April 12, 2021, 5:08 PM IST

ताज्या बातम्या