Home /News /kolhapur /

Earthquake in Maharashtra: कोल्हापुरात रात्री भूकंपाचा धक्का, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Earthquake in Maharashtra: कोल्हापुरात रात्री भूकंपाचा धक्का, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Earthquake in Kolhapur: कोल्हापूर जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास भूकंपाचा धक्का जाणवला आहे.

    कोल्हापूर, 5 सप्टेंबर : पश्चिम महाराष्ट्रात (Western Maharashtra) मध्यरात्रीच्या सुमारास भूकंपाचा धक्का (Earthquake) जाणवला असल्याचं वृत्त समोर येत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कोल्हापुरात (Kolhapur) रात्री 12 वाजण्याच्या सुमारास भूकंपाचा धक्का जाणवला. भूकंपाच्या या धक्क्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. Seismo.gov.in च्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर येथे रात्री 11 वाजून 49 मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाची तीव्रता 3.9 रिश्टर स्केल नोंदवण्यात आली आहे. कोल्हापुरपासून 19 किलोमीटर पश्चिमेकडे भूकंपाचे केंद्र असल्याचंही म्हटलं जात आहे. न्यूज एजन्सी एएनआयने सुद्धा या संदर्भातील वृत्त दिलं आहे. Approval Rating मध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदीचींच हवा, बनले जगातले पहिल्या क्रमांकाचे नेते, जो बायडेन यांनाही टाकलं मागं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण रात्रीच्या सुमारास झालेल्या या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचं वातवरण पसरलं आहे. भूकंपाचे धक्के बसताच अनेक नागरिकांनी घराबाहेर पळ काढला. भूकंपाची तीव्रता ही फार जास्त नसली तरी धरणीकंपामुळे नागरिक भयभीत झाले होते.
    First published:

    Tags: Earthquake, Kolhapur

    पुढील बातम्या