पत्नीचे अश्लील VIDEO व्हायरल करण्याची धमकी देत मागितले 10 लाख; कोल्हापूरातील घटना

पत्नीचे अश्लील VIDEO व्हायरल करण्याची धमकी देत मागितले 10 लाख; कोल्हापूरातील घटना

पत्नीचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो (Wife's obscene videos and photos) व्हायरल करण्याची धमकी (Threat to viral) देत 10 लाख रुपयांची खंडणी (Demand 10 Lakh) मागितल्याची धक्कादायक घटना कोल्हापूरात उघडकीस आली आहे.

  • Share this:

कोल्हापूर, 08 सप्टेंबर: पत्नीचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो (Wife's obscene videos and photos) व्हायरल करण्याची धमकी (Threat to viral) देत 10 लाख रुपयांची खंडणी (Demand 10 Lakh) मागितल्याची धक्कादायक घटना कोल्हापूरात उघडकीस आली आहे. आरोपीनं पीडित महिलेच्या पतीला अडवून ही धमकी दिली होती. बदनामी होईल या भीतीनं फिर्यादीनं आरोपीचा सर्व त्रास सहन केला. पण अखेर फिर्यादीनं पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी विविध कलमांतर्गत खंडणी मागणाऱ्या युवकाविरोधात गुन्हा दाखल (FIR Lodged) केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

पुढारीनं दिलेल्या वृत्तानुसार, देवदास बाळासाहेब घारे असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव असून तो कोल्हापूरातील जिवबा नाना जाधव पार्क परिसरातील रहिवासी आहे. संशयित आरोपी देवदास घारे यानं 23 ऑगस्ट रोजी फिर्यादीचा रस्ता अडवून धमकी दिली होती. तुझ्या पत्नीचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो माझ्याकडे आहे. त्यामुळे लवकरात लवकर 10 लाख रुपये दे, अन्यथा संबंधित सर्व फोटो आणि व्हिडीओ व्हायरल सोशल मीडियावर करेल' अशी धमकी दिली.

हेही वाचा-जिवापाड प्रेम केलेल्या प्रेयसीला दिला भयंकर मृत्यू; गोड बोलून लॉजवर बोलवलं अन्..

बदनामीच्या भीतीनं फिर्यादीनं काही दिवस संबंधित बाब कोणालाही सांगितली नाही. आरोपीकडून वाढता त्रास लक्षात घेत, फिर्यादीनं कोल्हापुरातील करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी देवदास घारे विरोधात खंडणीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप आरोपीला अटक केली नसून या घटनेचा तपास सुरू केला आहे. संबंधित घटनेत दोषी आढळणाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल, अशी  माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Published by: News18 Desk
First published: September 8, 2021, 5:06 PM IST

ताज्या बातम्या