Home /News /kolhapur /

शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या, कोल्हापुरातील खळबळजनक घटना

शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या, कोल्हापुरातील खळबळजनक घटना

Suicide

Suicide

अर्जुनवाडा ता. कागल येथील एका महाविद्यालयीन तरुणीने शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोल्हापूर, मुरगूड पोलिसांनी या शिक्षकाला अटक केली आहे.

    कोल्हापूर, 29 जानेवारी: अर्जुनवाडा ता. कागल येथील एका महाविद्यालयीन तरुणीने शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोल्हापूर, मुरगूड पोलिसांनी या शिक्षकाला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याच गावातील एक शिक्षक सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्याकडे लग्न करण्याचा तगादा लावला होता. गेल्या महिना दीड महिना पासून तिला त्रास देत होता. त्याच्या या त्रासाला कंटाळून सदरच्या तरुणीने विष प्राशन (Poison) करून आत्महत्या केली आहे. आकांक्षा तानाजी सातवेकर (वय 19) असे मृत तरुणीचे नाव आहे. कोल्हापूर, मुरगूड पोलिसांनी या प्रकरणी संशयित आरोपी म्हणून अमित भीमराव कुंभार या शिक्षकाला आज अटक केली आहे. नेमकं काय घडलं? मिळालेली माहितीनुसार, अर्जुनवाडा येथील रहिवाशी पण मुगळी (ता. कागल) येथील एका शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असणारा अमित कुंभार हा आपल्या गावातील महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या आकांक्षाला सतत फोन करत असे. गेल्या महिना दीड महिन्यापासून तो वेगवेगळे मेसेजेसही पाठवायचा. तु लग्नासाठी होकार दिलास तर, मी माझी बायको मुलांना सोडून तुझ्या बरोबर लग्न करण्यास तयार होईन. असे अनेक संदेश तो पाठवत होता. या सर्व प्रकारामुळे 22 जानेवारी रोजी आकांक्षाने कंटाळून आपल्या राहत्या घरीच विष प्राशन केले. तिला उपचारासाठी कोल्हापूर (Kolhapur) येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. यादरम्यान, 27 जानेवारी रोजी आकांक्षाने, "मी अमित कुंभार यांच्या त्रासाला कंटाळून विष प्राशन केल्याचा जबाब वैद्यकीय अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांच्या समोर दिला होता." मात्र, उपचार सुरू असतानाच काल दुपारी तिचा मृत्यू झाला आहे.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Crime news, Kolhapur

    पुढील बातम्या