Home /News /kolhapur /

Weather Forecast: कोकणासह घाट परिसरात ढगांची दाटी; या जिल्ह्यांत वरुणराजा गरजणार

Weather Forecast: कोकणासह घाट परिसरात ढगांची दाटी; या जिल्ह्यांत वरुणराजा गरजणार

Weather Forecast: पुढील तीन दिवसात राज्यात मान्सून वापसी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर राज्यात पाऊस सुरळीत होईल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

    कोल्हापूर, 05 जुलै: जून महिन्याच्या सुरुवातीला राज्यात मान्सूनचं (Monsoon) जोरदार आगमन झालं होतं. काही ठिकाणी जोरदार तर काही भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. मात्र पूर्ण राज्यात मान्सून पोहोचण्याआधीच त्याच्या प्रवासात खंड (Break) पडला आहे. त्यात यंदा मान्सून सरासरीपेक्षा काहीसा अधिक होईल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला होता. पण जून महिना उलटून गेला तरीही राज्यात शेतकऱ्यांसाठी अपेक्षित पाऊस पडला नाही. त्यामुळे राज्यभरात पेरणीचा खोळंबा झाला आहे. परिणामी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट वाढताना दिसत आहे. पुढील तीन दिवसात राज्यात मान्सून वापसी होईल, त्यानंतर राज्यात पाऊस सुरळीत होईल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे चांगल्या पावसासाठी शेतकऱ्यांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. दुसरीकडे आज राज्यात घाट परिसर, दक्षिण कोकण आणि गोवा परिसरात पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आज सातारा आणि कोल्हापूर परिसरात वेगवान वाऱ्याच्या साथीनं मेघगर्जना होण्याची शक्यता आहे. तर दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, आज सकाळपासून मुंबईत काळ्या ढगांची दाटी नोंदली गेली आहे. त्यामुळे आज मुंबईत कमी कालावधीसाठी जोरदार पावसाची शक्यता आहे. पण हा पाऊस फार काळ टिकणार नाही. चांगल्या पावसासाठी मुंबईकरांना चालू आठवड्याच्या शेवटपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. साप्ताहाच्या शेवटी मात्र मुंबईत चांगल्या पावसाला सुरुवात होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. हेही वाचा- राज्यात पावसाची दडी; या जिल्ह्यांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट विदर्भात तुरळक ठिकाणी कोसळणार पाऊस आज विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. विदर्भातील नागपूर, रामटेक, उमरेड, भंडारा, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या परिसरात आज ढगांचा गडगडाट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, ताशी 30-40 प्रतितास वेगानं वारा वाहण्याची शक्यता आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Maharashtra, Weather forecast

    पुढील बातम्या