मुंबई, 7 जुलै: पॉझिटिव्हिटी दर (Positivity Rate in Maharashtra) जास्त असलेल्या कोल्हापूर, सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात केलेल्या उपाययोजनांनंतरच्या स्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief minister uddhav thackeray) यांनी बुधवारी आढावा घेतला. यात सर्वच जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी दर तुलनेने कमी होत असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. हा दर आणखी कमी करण्यासाठी RTPCR चाचणीची संख्या वाढवणे, गृह विलगीकरण कमी करून संस्थात्मक उपचाराला गती, लसीकरण वाढवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती त्यांनी दिली. नगर जिल्ह्यात जिनोम सिक्वेन्सिंग करा, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी अहमदनगर (Coronavirus latest update in Ahmednagar district) जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात जनुकिय उत्प्रवर्तन (जिनोम सिक्वेन्सी) करून घ्या, असा आदेश मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाला दिला. होमगार्ड नियुक्त्या, फिरती चाचणी केंद्रे आणि इतर आरोग्य सुविधांविषयक मागणीचा ज्या जिल्ह्यांनी उल्लेख केला त्यांच्या मागणीची दखल घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.
जीनोम सिक्वेन्सिंग म्हणजे काय?
Genome Sequencing हा एखाद्या विषाणूचा बायोडाटा असतो. एखादा विषाणू कसा दिसतो, कसा आहे याची माहिती या माध्यमातूनच मिळते. याच विषाणूच्या विशाल समूहाला जीनोम म्हटलं जातं. विषाणूबाबत जाणण्याच्या प्रक्रियेला जीनोम सिक्वेन्सिंग म्हणतात.
खासगी रुग्णालयांनी लसींचे डोस वाढवून मागावेत
चाचण्या वाढवणे, गृह विलगीकरण कमी करणे हे पॉझेटिव्हीटी रेट जास्त असलेल्या जिल्ह्यांसाठी महत्वाचे असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. त्यांनी राज्यातील खासगी रुग्णालयांनी लसीचे डोस वाढवून मागितल्यास राज्यात लसीकरणाला आणखी वेग देता येईल, त्याकडे लक्ष वेधले. ऑक्सिजनची तयारी पूर्णत्वाला नेतांना जिल्ह्यांनी त्याच्या तांत्रिक आणि दर्जात्मक गुणवत्तेची काळजी घ्यावी, परमिट टु वर्क चा परवाना मिळवावा, सर्व काम शास्त्रशुद्ध पद्धतीने व्हावे अशा सूचना दिल्या.
जिद्द कायम ठेवा
कोरानामुक्त गावांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सरपंचांची बैठक घेऊन गाव कोरोनामुक्त होईल याची दक्षता घ्यावी, वस्ती केंद्रीत करून गाव कोरोना मुक्त करावे अशा सुचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या बैठकीत विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजना सांगितल्या तसेच तिसऱ्या लाटेला परतवून लावण्यासाठी केलेली तयारीही सांगितली तेंव्हा कोरोनाला हरवण्याची तुमची जिद्द कौतूकास्पद आहे ती कायम ठेवा असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.