Home /News /kolhapur /

मुंबै बँक उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेला धक्का, चंद्रकांत पाटील म्हणाले 'मविआत शिवसेनेला संपवण्याचा कट सुरू'

मुंबै बँक उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेला धक्का, चंद्रकांत पाटील म्हणाले 'मविआत शिवसेनेला संपवण्याचा कट सुरू'

मुंबै बँक निवडणूक निकालानंतर चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेबाबत केलं मोठ वक्तव्य

मुंबै बँक निवडणूक निकालानंतर चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेबाबत केलं मोठ वक्तव्य

Chandrakant Patil on Shiv Sena: मुंबै बँकेच्या अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेला एक मोठा धक्का बसला. या निवडणुकीत उपाध्यक्ष पदावर भाजप उमेदवार विजयी झाला. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे.

    कोल्हापूर, 14 जानेवारी : मुंबै बँकेच्या अध्यक्ष पदासाठी आणि उपाध्यक्ष पदासाठीची निवडणूक (Mumbai Bank election) काल (13 जानेवारी) पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) एकत्र येत भाजपला एक जोरदार धक्का दिला. या निवडणुकीत अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या सिद्धार्थ कांबळे (Siddharth Kamble) यांची निवड झाली आहे. तर, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराचा मात्र पराभव झाला आहे. समसमान मत पडल्यामुळे ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. यात भाजपचे उमेदवार विठ्ठल भोसले (Vitthal Bhosale) यांची निवड झाली आहे. उपाध्यक्ष पद हातातून गेल्याने हा एक शिवसेनेला धक्का बसला. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेला संपवण्याचा प्लॅन सुरू आहे चंद्रकांत पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबै बँकेच्या अध्यक्षपद मिळवण्यात यश मिळवलं पण शिवसेनेचा उमेदवार उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पडला... कसं झालं हे? आता हे शिवसेनेला कळत नाहीये की, तुम्हाला पूर्णपणे संपवण्याचा एक प्लॅन चालला आहे आणि त्या प्लॅनमध्ये तुम्ही फसत चालला आहे. वाचा : शिवसेना-राष्ट्रवादीचा भाजपला दणका, मुंबै बँक निवडणूक जिंकली आता तुम्ही उत्तरप्रदेश आणि गोव्यात ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन चालले आहात. शिवसेनेला अशी सवयच आहे की गेले आणि डिपॉझिट जप्त झाले. राष्ट्रवादीची त्या निमित्ताने मतं वाढतात आणि एक अखिल भारतीय पक्ष होण्यासाठी कमीत कमी मतदारांची, मतांची आवश्यकता असते... तुम्ही का सर्व ठिकाणी जाऊन पराभव करत आहात? असा सवालही चंद्रकांत पटील यांनी केला आहे. वाचा : मुंबै बँक उपाध्यक्ष निवडणुकीत भाजप विजयी, सेना-राष्ट्रवादीला धक्का काय घडलं निवडणुकीत? मुंबै बँकेच्या अध्यक्षपदी सिद्धार्थ कांबळे यांची निवड झाली आहे. सिद्धार्थ कांबळे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिली होती. तर, उपाध्यक्षपदी अभिषेक घोसाळकर यांना उमेदवारी दिली होती. पण, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत समसमान मत मिळाली. त्यामुळे ईश्वर चिठ्ठीने निकाल काढण्यात आला असून, यात भाजपचे उमेदवार विठ्ठल भोसले यांची निवड झाली. त्यामुळे अध्यक्षपद गेले असले तरी, उपाध्यक्षपदी भाजपने बाजी मारली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यामुळे 11 संचालक सदस्य संख्या झाली. तर, भाजपकडे 9 संचालक संख्या होती. त्यामुळे महाविकास आघाडीच्या पारड्यात जास्त मतं आली. पण, उपाध्यपदाच्या निवडणुकीत समसमान मतं मिळाल्यामुळे गोंधळ झाला. त्यामुळे महाविकास आघाडीला उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: BJP, Chandrakant patil, Kolhapur, Shiv sena

    पुढील बातम्या