कोल्हापूर: गाडी होत होती गरम, तरीही केला प्रवास; हॉटेल व्यावसायिकाचा होरपळून मृत्यू

कोल्हापूर: गाडी होत होती गरम, तरीही केला प्रवास; हॉटेल व्यावसायिकाचा होरपळून मृत्यू

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील (kolhapur ratnagiri highway) बोरपाडळे घाटात कारने अचानक पेट घेतल्याने (car catch fire in borpadle ghat) एका हॉटेल व्यावसायिकाचा होरपळून मृत्यू (hotel businessman death) झाल्याची घटना समोर आली आहे.

  • Share this:

कोल्हापूर, 24 सप्टेंबर: कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील (kolhapur ratnagiri highway) बोरपाडळे घाटात कारने अचानक पेट घेतल्याने (car catch fire in borpadle ghat) एका हॉटेल व्यावसायिकाचा होरपळून मृत्यू (hotel businessman death) झाल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी दुपारी बोरपाडळे घाटातून हॉटेलच्या दिशेनं जाताना ही दुर्घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत हॉटेल व्यावसायिकाचा जागीच मृत्यू झाला आहे. भररस्त्यात ही दुर्घटना घडल्याने एक तास महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी येऊन आग आटोक्यात आणली आहे.

संबंधित दुर्घटनेत मृत पावलेल्या हॉटेल व्यावसायिकाचं नाव अभिजित पांडुरंग ठाणेकर (वय-32) असून ते आजरा तालुक्यातीलल पिंपळगाव झुलपेवाडी येथील रहिवासी आहेत. मृत अभिजित हे गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास आपल्या कारने पन्हाळा तालुक्यातील नावली येथील आपल्या धाब्याच्या दिशेने जात होते. दरम्यान कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील बोरपाडळे घाटात त्यांच्या कारने अचानक पेट घेतला. या आगीचं रुप इतकं भयंकर होतं की कारने एका क्षणातच रौद्ररूप धारण केलं.

हेही वाचा-Beed:वाढदिवसाला बोलावून पोत्यात गुंडाळून पेटवलं; 19 वर्षीय तरुणाची भयावह अवस्था

आगीचा भडका इतका भयंकर होता की, त्यांना कारमधून बाहेरही येता आलं नाही. या दुर्दैवी घटनेत अभिजित यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अथक प्रयत्नानंतर त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. दरम्यान रस्त्यावरून जाणाऱ्या अनेकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. त्यामुळे महामार्गावर बराच काळ वाहतूकीचा खोळंबा झाला होता.

हेही वाचा-सातारा: घरात घुसत मुलीचं तोंड दाबून चिरला गळा; एकतर्फी प्रेमाचा रक्तरंजित शेवट

विशेष म्हणजे, आपली कार गरम होतं असल्याची माहिती अभिजित यांना आधीपासूनच होती. याबाबत अभिजित यांनी आपल्या मित्राला फोन करून कार गरम होतं असल्याची माहिती दिली होती. धोका डोळ्यासमोर दिसत असताना, अभिजित यांनी आपल्या कारमधून प्रवास केला आणि हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर एअरबॅगचा स्फोट झाल्याने अभिजित कारमध्ये अडकले आणि यातच त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Published by: News18 Desk
First published: September 24, 2021, 9:01 AM IST
Tags: kolhapur

ताज्या बातम्या