किरीट सोमय्यांनी हसन मुश्रीफांविरोधात पोलिसांत दिली तक्रार

किरीट सोमय्यांनी हसन मुश्रीफांविरोधात पोलिसांत दिली तक्रार

अखेर किरीट सोमय्या कोल्हापूरला दाखल झाले. त्यानंतर मुरगूड पोलीस ठाण्यात मुश्रीफ यांच्याविरोधात तक्रार दाखल केली.

  • Share this:

कोल्हापूर, 28 सप्टेंबर : भाजपचे (bjp)  नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) अखेर आज कोल्हापुरात दाखल झाले. कागलमध्ये पाहणी केल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (hasan mushrif) आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात  पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबावर गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले आहे. तीन दिवसांपूर्वी कोल्हापूरला जाण्यापासून रोखण्यात आले होते. त्यानंतर आज सोमय्या अखेर कोल्हापूरला दाखल झाले. त्यांनी कागल येथील कारखान्यांची पाहणी केली. त्यानंतर

मुरगूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

महापौरांच्या आईलाही सेल्फीची भुरळ; लेकासोबतचा फोटो सोशल मीडियात व्हायरल

हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांच्याविरोधात आयपीसी 120 ब, 420, 467, 468, 471 अशा वेगवेगळ्या कलमाखाली हसन मुश्रीफ आणि त्यांच्या परिवाराच्या विरोधात ही तक्रार केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जंग जंग पछाडले. तरी मी पोलीस ठाण्यात पोचलो.  माफियागिरीसारखा पोलिसांचा वापर केला. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील च्या आदेशानुसार मला कोंडून ठेवलं कोणत्या अधिकारात त्यांनी हे केलं यासाठी राज्यपालांकडे तक्रार करणार आहे,  मानव अधिकार कार्यालयात तक्रार करणार आहे, असं यावेळी सोमय्या म्हणाले.

मांजरेकरांचा Look पाहून नेटकऱ्यांना झाली 'या' राजकरण्याची आठवण

'मला खात्री आहे, ठाकरे सरकार या पोलीस स्टेशनकडून तक्रार दाखल करून घेणार नाही. सात दिवसात एफआयआर दाखल नाही केलं तर न्यायालयात जाणार आहे, असा इशाराही सोमय्यांनी दिला.

याआधी 20 तारखेला किरीट सोमय्या यांनी कोल्हापूरला जाण्यासाठी निघाले होते. महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरला रवानाही झाले होते. पण, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्ननिर्माण होईल म्हणून जिल्हाबंदीची नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर सोमय्यांना कऱ्हाड स्थानकावर ताब्यात घेतले होते. त्यानंतर अखेर सोमय्या हे कोल्हापूरला दाखल झाले. यावेळी त्यांना येण्यास कोणतीही मनाई करण्यात आली नव्हती.

Published by: sachin Salve
First published: September 28, 2021, 4:33 PM IST
Tags:

ताज्या बातम्या