मराठी बातम्या /बातम्या /kolhapur /राज्यपालांचं वय काढल्यामुळे चंद्रकांत पाटील संतापले, शरद पवारांच्या वयावरून लगावला खोचक टोला

राज्यपालांचं वय काढल्यामुळे चंद्रकांत पाटील संतापले, शरद पवारांच्या वयावरून लगावला खोचक टोला

 'पवारांचे भाष्य ऐकून मती गुंग झाली. खोटं बोला पण रेटून बोला, याची प्रचिती आज झाली'

'पवारांचे भाष्य ऐकून मती गुंग झाली. खोटं बोला पण रेटून बोला, याची प्रचिती आज झाली'

'पवारांचे भाष्य ऐकून मती गुंग झाली. खोटं बोला पण रेटून बोला, याची प्रचिती आज झाली'

कोल्हापूर,16 ऑगस्ट : राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीवरून (MLAs appointed by Governor)  पुन्हा एकदा महाविकास आघाडी (mva government) आणि भाजपमध्ये (bjp) वाद पेटला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी राज्यपालांची वय काढल्यामुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.  मग पवारांचं वय झाले नाही का? असा अजब सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी विचारला.

शरद पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन दिल्लीपासून ते राजभवनापर्यंत भाजप नेत्यांवर चौफेर टीकास्त्र सोडले. शरद पवारांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी चंद्रकांत पाटलांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले.

...तर पुन्हा Lockdown; निर्बंध हटवल्याच्या पहिल्याच दिवशी CM ठाकरेंनी दिला इशारा

'राज्यपालांचं वय झालं आहे, त्यामुळे त्यांना विसर पडला असेल, असं पवार म्हणाले आहे. मग राज्यपालांचे वय झालं आहे त पवारांचे वय झाले नाही का? कशाला वयाचा मुद्दा काढता, असा खोचक टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला.

'पवारांचे भाष्य ऐकून मती गुंग झाली. खोटं बोला पण रेटून बोला, याची प्रचिती आज झाली. मंत्रालयात बोलवा सगळ्यांना, समोरासमोर होऊन जाऊ दे काय खरं आणि काय खोटं.  देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण टिकवले होते ते तुम्हाला का जमले नाही, असा सवाल पाटील यांनी उपस्थितीत केला.

VIDEO च्या बहाण्याने 4 मित्रांनी केला घात; मृतदेह रुग्णालयाबाहेर ठेवून काढला पळ

'लोकांना खोटं सांगण्यासाठी सभा घेतल्या तर त्यापाठोपाठ आमच्या सभा देखील होतील. गावोगाव जाऊन खोटं सांगणार असतील तर आम्ही पोलखोल सभा घेणार, राज्यभर सभा घेतल्या जातील, असा इशाराही पाटील यांनी दिला.

हे सगळं प्रकरण अंगावर शेकल्यामुळे अशी वक्तव्य केली जात आहेत. सगळी फसवणूक करायचं काम हे सरकार करतंय. 50 टक्के दिलं तरी काम करावं लागेल, त्यामुळे राज्य सरकार खोटं बोलत आहे. 58 वर्ष तुमचं राज्य होत, तुमचे हात कुणी बांधले होते का? असा सवाल पाटील यांनी पवारांना विचारला.

काय म्हणाले होते पवार?

शरद पवार यांनी राज्यपाल नियुक्त आमदारांच्या मुद्यावरून राज्यपालांना कडक इशारा दिला आहे. राज्यपालांनी पुण्यात बोलत असताना राज्य सरकारला आवश्यकता नाही, असा टोला लगावला होता. त्यावरून शरद पवारांनी आपल्या शैलीत सणसणीत उत्तर दिले आहे.

राज्यात Delta Plus चे संकट वाढले, आणखी 10 रुग्ण आढळले, नवी माहिती आली समोर!

'यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र दिले, तिन्ही पक्षाचे नेते पत्र देऊन आले. पण राज्यपाल यांना वाढत्या वयामुळे त्यांच्या लक्षात राहत नाही, असा सणसणीत टोला पवारांनी राज्यपालांना लगावला.

तसंच, 'आता 'शहाण्याना शब्दाचा मार.. फक्त शहाण्यांना, या पुढे 12 आमदारांबाबत शब्द खर्ची घालणार नाही, असा थेट इशाराच पवारांनी दिला.

First published:
top videos

    Tags: शरद पवार