Home /News /kolhapur /

मंजूर कर्जाची रक्कम देण्यास बँक अधिकाऱ्यांची टाळाटाळ; कोल्हापुरातील तरुणानं आयुष्याचा केला भयावह शेवट

मंजूर कर्जाची रक्कम देण्यास बँक अधिकाऱ्यांची टाळाटाळ; कोल्हापुरातील तरुणानं आयुष्याचा केला भयावह शेवट

जय डवंग असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. (File Photo)

जय डवंग असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. (File Photo)

कर्ज मंजूर झाल्यानंतर कर्जाची रक्कम देण्यासाठी बँकेतील अधिकाऱ्यांनी टाळाटाळ (Bank officials refrain to give sanctioned loans) केल्यानं एका तरुणानं आपल्या आयुष्याचा शेवट केला (young man commits suicide) आहे.

    कोल्हापूर, 15 सप्टेंबर: कर्ज मंजूर झाल्यानंतर कर्जाची रक्कम देण्यासाठी बँकेतील अधिकाऱ्यांनी टाळाटाळ (Bank officials refrain to give sanctioned loans) केल्यानं एका तरुणानं आपल्या आयुष्याचा शेवट केला (young man commits suicide) आहे. सातत्यानं बँकेचे हेलपाटे मारूनही कर्ज मिळत नसल्यानं तरुणानं विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. याप्रकरणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखा अधिकाऱ्यासह बँक निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. जय डवंग असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. मृत जय हा कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील रहिवासी आहे. त्यानं काही दिवसांपूर्वी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळात कर्जासाठी अर्ज दाखल केला होता. त्याला बँकेकडून कर्ज मंजूरही झालं होतं. पण मंजूर झालेलं कर्ज देण्यासाठी बँकेतील अधिकारी टाळाटाळ करत होते. अनेक दिवस हेलपाटे मारूनही मंजूर झालेल्या कर्जाची रक्कम मिळत नसल्यानं जय याला नैराश्य आलं होतं. हेही वाचा-महिलांवरील अत्याचारचं सत्र थांबेना; जालन्यात शाळकरी मुलीला फरफटत नेत बलात्कार यातूनच जयने 20 ऑगस्ट रोजी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानं विष प्राशन केल्याच समजताच नातेवाईकांनी त्याला तातडीनं रुग्णालयात उपचाराठी दाखल केलं. याठिकाणी उपचार सुरू असताना, जयचा 23 ऑगस्ट रोजी दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या आत्महत्येप्रकरणी आता बँक निरीक्षक राजेंद्र बेलेकर आणि शाखा अधिकारी नामदेव खोत यांच्या विरोधात कळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Kolhapur, Suicide

    पुढील बातम्या