कोल्हापूर, 20 एप्रिल : 'उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश गुजरात अशा भाजपच्या राज्यात भोंगे बंद आहेत का हे राज ठाकरेंनी पहावं. तिथे भोंगे बंद नसतील तर महाराष्ट्रात अशी मागणी करण्याचा अधिकार राज ठाकरेंच्या आडून भाजपला करण्याचा अधिकार नाही' असं म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (jayant patil) यांनी राज ठाकरेंना ( Raj Thackeray) खोचक टोला लगावला.
राष्ट्रवादीच्या संवाद यात्रेला प्रारंभ झाला आहे. आज कोल्हापूरमध्ये जयंत पाटील माध्यमांशी बोलत असताना राजकीय घडामोडींवर भाष्य केलं.
'राज ठाकरे यांनी भाजपच्या हातातलं बाहुलं म्हणून काम करायला सुरुवात केली आहे म्हणूनच योगिनी त्यांची काळजी घेतली. आम्ही लोकांच्यापुढे मत मागायला धर्माची भूमिका घेऊन जात नाही. आम्ही हिंदूच आहोत कदाचित आमच्याकडे त्यांच्या पेक्षा जास्त कडक पाळत जात असेल, असं जयंत पाटील म्हणाले.
(राज्यात अराजकता माजण्याची भीती, गृहमंत्री राज ठाकरेंसोबत करणार बातचित)
'आवाजाच्या लिमिटमध्ये राहून भोंगे वाजत असतील तर त्याला विरोध करायचा अधिकार आपल्याला नाही. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश गुजरात अशा भाजपच्या राज्यात भोंगे बंद आहेत का हे राज ठाकरेंनी पहावं. तिथे भोंगे बंद नसतील तर महाराष्ट्रात अशी मागणी करण्याचा अधिकार राज ठाकरेंच्या आडून भाजपला करण्याचा अधिकार नाही' असा टोला पाटील यांनी भाजपला लगावला.
राज्यपालांची भूमिका काय आहे मला माहित नाही. काही अडचणी असतील त्याला पक्ष म्हणून त्यांना आवश्यक उत्तर देऊ, असंही पाटील म्हणाले.
(बँकेत Fixed Deposit करण्याआधी 'या' गोष्टी लक्षात घ्या)
'राजू शेट्टींचा विषय कधी संपला. आमच्या सरकारने जेवढी मदत शेतकऱ्यांना केली तेवढी कधीच झाली नाही. त्यांनी महाविकास आघाडी मधून बाहेर जाण्याचं कोणतचं कारण नाही. तशी आवश्यकत नाही. त्यांनी घोषणा केली असली तरी त्यांनी आमच्या सोबत राहावं,. भेटीची संधी मिळाली तर त्याना नक्की भेटू. शेट्टींनी नाव वगळयासाठी राज्यपालांची भेट घेतली असली तरी त्यांच नाव आमच्या पक्षा कडून गेलं आहे', असंही पाटील यांनी स्पष्ट केलं.
'250 पेक्षा जास्त मतदार संघ 350 पेक्षा जास्त तालुक्याना भेट दिली. कार्यकर्त्यांकडून राज्यसरकार आणि पक्षाकडून काय अपेक्षा याचा आढावा घेतला. संकल्प सभेनं कोल्हापूरमध्ये याची सांगता होईल. या प्रवासात बऱ्याच लोकांचे पक्ष प्रवेश झाले. जुन्या लोकांना पुन्हा येण्याची इच्छा आहे. उद्या एका शहरातील नगरसेवक अजितदादांच्या उपस्थितीत होईल', अशी माहितीही पाटील यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.