कोल्हापूर, 19 जानेवारी: सामान्य नागरिकांच्या विविध मौल्यवान वस्तूंवर चोरट्यांचा डोळा असतो. थोडाही हलगर्जीपणा झाला तर चोरटे मोबाईल, सोनं, पाकीट अशा वस्तू हातोहात लंपास करतात. पण कोल्हापुरात एक चोरटा पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. हा चोरटा गेल्या काही काळापासून एका न्यायाधीशांचे वाळत घातलेले कपडे चोरून घेऊन जात होता. धुतलेले आणि वाळत घातलेले कपडे कोणीतरी चोरून घेऊन जात असल्याने न्यायाधीश वैतागले होते. त्यामुळे त्यांनी अखेर कर्मचाऱ्यांच्या मदतीने वाळत घातलेल्या कपड्यावर पाळत ठेवायला सुरुवात केली.
सोमवारी पहाटे अखेर दोरीवर वाळत घातलेले कपडे चोरटा भामटा तावडीत सापडला आहे. न्यायालयाच्या काही कर्मचाऱ्यांनी सापळा रचून त्याला पकडलं आहे. संबंधित घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. कर्मचाऱ्यांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास भुदरगड पोलीस करत आहेत.
हेही वाचा-इच्छा असूनही लेकाला किडनी देता येईना; प्रत्यारोपणाच्या खर्चापुढे हतबल झाली माऊली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात गारगोटी येथे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचं न्यायालय आहे. या न्यायालयाच्या आवारात फिर्यादी न्यायाधीश आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहेत. मागील काही काळापासून त्यांच्या निवासस्थानाच्या बाहेर दोरीवर वाळत घातलेले कपडे कुणीतरी चोरुन घेऊन जात होतं. धुतलेले कपडे चोरून नेण्याचा प्रकार वाढत गेल्याने न्यायाधीश वैतागले होते. त्यामुळे त्यांनी न्यायालयाच्या काही कर्मचाऱ्यांच्या मदतीने वाळत घातलेल्या कपड्यांवर नजर ठेवायला लावली.
हेही वाचा-कोल्हापूर: अनर्थ घडण्याआधीच पोहोचले पोलीस, सतर्कतेमुळे वाचला मायलेकीचा जीव
यावेळी सोमवारी पहाटे सुशांत चव्हाण नावाचा तरुण न्यायाधीशांच्या निवासस्थान परिसरात आला. त्याने दोरीवर वाळत घातलेल्या कपड्यांवर डल्ला मारला आणि पळून जाऊ लागला. यावेळी न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांनी पाठलाग करत संबंधित तरुणाला ताब्यात घेतलं आहे. यानंतर कर्मचाऱ्यांनी संबंधित तरुणाला भुदरगड पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
तुमच्या शहरातून (कोल्हापूर)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.