Home /News /kolhapur /

काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; 2 वर्षांच्या चिमुरड्याला कारने फरफटत नेलं, जागीच मृत्यू

काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; 2 वर्षांच्या चिमुरड्याला कारने फरफटत नेलं, जागीच मृत्यू

मुलं कारला अडकलं होतं, मात्र तरीही चालकाने कार थांबवली नाही.

सांगली, 21 मार्च : जत (Sangali News) तालुक्यात काळजाचा थरकाप उडवणार अपघात झाला आहे. विजापूर - गुहागर या राष्ट्रीय मार्गावरील धावडवाडी येथे एका दोन वर्षाच्या मुलाला तीनशे मीटर फरफटत नेल्याची ह्रदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. ज्यामध्ये अब्दुल समद साजिद शेख हा चिमुरडा ठार झाला. तर त्याचे आई-वडील गंभीर जखमी झाले आहेत. दुचाकी आणि चारचाकी वाहनांमध्ये हा अपघात झाला आहे. जत तालुक्यातील धावडवाडी येथे एका इंडिका कारने मोटरसायकलस्वार पती-पत्नीला त्यांच्या लहान मुलासह फरपटत नेल्याचा प्रकार समोर आला. यामध्ये दोन वर्षाच्या लहान बालकाचा जागीच मृत्यू झाला तर पती-पत्नी दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अब्दुल समद साजिद शेख असे या चिमुरडयाचे नाव आहे. विजापूर - गुहागर या राष्ट्रीय मार्गावर साजिद लालखान शेख व यांच्या पत्नी जमीन साजिद शेख आपल्या मुलासह धावडवाडी येथून दुपारच्या सुमारास मोटर सायकलने निघाले असता मागून येणाऱ्या एम.एच. 12 एच एन 1674 इंडिका विस्टा कारने जांभूळवाडी फाट्याजवळ जोराची धडक दिली. ज्यामध्ये साजिद शेख हे जोराने उडून बाजूला बेशुद्धावस्थेत पडले. तर पत्नी व मुलगा गाडीच्या बंम्पर मध्ये अडकून फरफटत तीनशे मीटर पर्यंत पर्यंत गेले. त्यानंतर जबिन शेख या सुद्धा रस्त्याच्या बाजूला फेकल्या गेल्या. मात्र लहान बाळ अब्दुल समद हा गाडीच्या बंपर मध्ये अडकून राहिला आणि निर्दयी चालकाने तशीच भरधाव वेगाने गाडी पळवली. ज्यामध्ये अब्दुल समद हा अडकून फरफटत होता. महामार्गावर पुढे असणाऱ्या चोरीची येथे स्टॅण्डवरील नागरिकांनी त्या गाडीतील चालकास आवाज दिला. पण आवाज ऐकून सुद्धा ती गाडी न थांबताच आणखी वेगाने ते पुढे निघाली. चोरोची येथील काही नागरिकांनी त्यांचा पाठलाग करून ती गाडी अडवली. तोपर्यंत गाडीवाल्याने लहान मुल बाजूला काढून टाकले होते हे पाहताच नागरिकांचा संताप उसळला आणि जमावाने त्यांना धरून बेदम चोप दिला. त्यापाठोपाठ धावडवाडी येथील त्या लहान बालकाचे नातेवाईक पोहोचले. त्या बालकाला घेऊन ते ढालगाव येथे रुग्णालयात पोहोचले, पण काहीच उपयोग झाला नाही. हे ही वाचा-सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'जगातील सर्वात चांगलं सासर'; इंजिनिअर सुनेची आत्महत्या त्याच्या फरफट होऊन त्यास गंभीर दुखापत इजा झाली होती. त्यात त्याची प्राणज्योत मालवली. दुसरीकडे तोपर्यंत धावडवाडी येथील लोकांनी साजिदलाल खान शेख व जमीन साजिद शेख या दोघांना जत येथे खाजगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जत येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जत येथील ग्रामीण रुग्णालयात मुलाचे शवविच्छेदन करून पंचनामा केल्या नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
Published by:Meenal Gangurde
First published:

Tags: Road accident, Sangali

पुढील बातम्या