मराठी बातम्या /बातम्या /kolhapur /

झटपट श्रीमंतीच्या नादात गमावले 27 लाख; शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली झाली लूट

झटपट श्रीमंतीच्या नादात गमावले 27 लाख; शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली झाली लूट

Crime in Kolhapur: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला लावून कोल्हापुरातील एका दाम्पत्याची तब्बल 27 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime in Kolhapur: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला लावून कोल्हापुरातील एका दाम्पत्याची तब्बल 27 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime in Kolhapur: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला लावून कोल्हापुरातील एका दाम्पत्याची तब्बल 27 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Published by:  News18 Desk
कोल्हापूर, 05 जानेवारी: गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक (investment in share market) करणाऱ्या नागरिकांची प्रचंड वाढ झाली आहे. शेअर मार्केटचं कोणतंही ज्ञान नसताना, एखाद्या व्यक्तीच्या सांगण्यावरून लाखो रुपयांची गुंतवणूक शेअर मार्केटमध्ये केली जात आहे. अशात अशा नवख्या गुंतवणुकदारांची फसवणूक होण्याचं प्रमाण देखील वाढलं आहे. अशीच एक घटना कोल्हापुरातील (Kolhapur) जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. येथील एका दाम्पत्याला तब्बल 27 लाखांना गंडा (27 lakh fraud) घालण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसात फिर्याद दाखल केली असून घटनेचा तपास केला जात आहे. किरण महिपती भुईगडे आणि माधुरी भुईगडे असं गुन्हा दाखल (FIR lodged) झालेल्या आरोपी दाम्पत्याचं नाव आहे. दोघंही कोल्हापुरातील फुलेवाडी रिंग रोड परिसरातील मनोहर कोतवाल नगर येथील रहिवासी आहेत. याप्रकरणी सुरेखा बाळू गंभीरे यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. जुना राजवाडा पोलिसांनी सुरेखा गंभीरे यांच्या फिर्यादीवरून फसवणुकीसह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हेही वाचा-Bulli Bai App : 18 वर्षीय तरुणी निघाली मास्टरमाईंड, कोण आहे ही मुलगी ? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुरेखा गंभीरे आणि संशयित आरोपी भुईगडे दाम्पत्य यांची कौटुंबीक मैत्री आहे. फिर्यादी गंभीरे यांचे पती बाळू गंभीरे याचं अल्प शिक्षण झालं आहे. बाळू गंभीरे यांच्या अल्प ज्ञानाचा फायदा घेत आरोपी भुईगडे दाम्पत्याने त्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडलं आहे. त्यासाठी भुईगडे दाम्पत्याने गंभीरे यांच्याकडून एप्रिल 2018 ते जून 2020 पर्यंत वेळोवेळी 34 लाख रुपये घेतले आहेत. हेही वाचा-Ratnagiri: बँक मॅनेजरसह 23 जणांनी युनियन बँकेला लुटलं; 5 कोटींचा लावला चुना 34 लाख रुपये घेतल्यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या पतीला कोणताही परतावा दिला नाही. त्यामुळे संबंधित रक्कम परत देण्याचा तगादा बाळू गंभीरे यांनी लावल्यानंतर आरोपींनी ऑगस्ट 2021 मध्ये 7 लाख 56 हजार रुपये फिर्यादीला परत दिले आहे. पण उर्वरित 27 लाख रुपये देण्यास टाळाटाळ केली जात आहे. अखेर सुरेखा गंभीरे यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी फसवणुकीसह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
First published:

Tags: Crime news, Financial fraud, Kolhapur

पुढील बातम्या