कोल्हापूर: मामाची भेट अखेरची ठरली! घरी परतताना दोघांवर काळाचा घाला, हृदय हेलावणारी घटना

कोल्हापूर: मामाची भेट अखेरची ठरली! घरी परतताना दोघांवर काळाचा घाला, हृदय हेलावणारी घटना

Bike Accident in Kolhapur: कोल्हापूर जिल्ह्यातील मलकापूर याठिकाणी एक हृदय हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. मामाला भेटून आपल्या गावी परत येत असताना, दोघांवर काळाने घाला घातला आहे.

  • Share this:

मलकापूर, 24 सप्टेंबर: कोल्हापूर जिल्ह्यातील मलकापूर याठिकाणी एक हृदय हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. मामाला भेटून आपल्या गावी परत येत असताना, दोघांवर काळाने घाला घातला आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका डंपरला दुचाकीने जोरदार धडक मारल्याने (Bike accident) दोघांचा दुर्दैवी (2 friends death) अंत झाला आहे. ही घटना सायंकाळी साडेसातच्या सुमारास करंजफेण-येळवण जुगाई मार्गावरील मोसम गावच्या हद्दीत घडली आहे. एकाच दिवशी दुर्दैवी अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.

बाळासाहेब लहू भातडे (वय-20) आणि सचिन बाळकृष्ण शेलार (वय-22) असं मृत पावलेल्या दोघा तरुणांची नावं आहेत. दोघेही मृत तरुण शाहूवाडी तालुक्यातील मांजरे येथील रहिवासी आहेत. बाळासाहेब आणि सचिन हे दोघे जीवलग मित्र होते. घटनेच्या दिवशी दोघंही बाळासाहेबच्या मामाला भेटण्यासाठी करंजफेण येथे दुचाकीने गेले होते. पण त्यांची मामाची ही भेट त्यांची अखरेची भेट ठरली आहे.

हेही वाचा-सातारा: घरात घुसत मुलीचं तोंड दाबून चिरला गळा; एकतर्फी प्रेमाचा रक्तरंजित शेवट

मामाला भेटून झाल्यानंतर दोघंही आपल्या दुचाकीने मांजरी गावाकडे येत होते. दरम्यान करंजफेण-येळवण जुगाई रस्त्यावरील मोसम गावच्या हद्दीत रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या एका डंपरवर मोटारसायकल जोरदार धडकली. यामध्ये बाळासाहेब आणि सचिन यांचा जागीच मृत्यू झाला आहे. रात्री उशीरा दोघांवर अत्यंसंस्कार करण्यात आले आहेत.

हेही वाचा-गाडी होत होती गरम, तरीही केला प्रवास; हॉटेल व्यावसायिकाचा होरपळून मृत्यू

बाळासाहेब याने पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं होतं. तर सचिन हा त्याच्या आई वडिलांना एकुलता एक असून तो हॉटेल कामगार म्हणून काम करत होता. पण मामाला भेटून परत येत असताना, अचानक घडलेल्या अपघातात या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. गावातील दोन तरुणांचा अशाप्रकारे एकाच दिवशी मृत्यू झाल्याने मांजरे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Published by: News18 Desk
First published: September 24, 2021, 10:09 AM IST

ताज्या बातम्या