Home /News /kolhapur /

कॉलेजला जाण्याची तयारी केली पण घरातच आढळली मृतावस्थेत, कोल्हापुरात युवतीचा हृदयद्रावक शेवट

कॉलेजला जाण्याची तयारी केली पण घरातच आढळली मृतावस्थेत, कोल्हापुरात युवतीचा हृदयद्रावक शेवट

(फोटो- लोकमत)

(फोटो- लोकमत)

Suicide in Kolhapur: कागल तालुक्यात एका 17 वर्षीय अल्पवयीन युवतीने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.

    कोल्हापूर, 11 जानेवारी: कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्याच्या कागल तालुक्यात एका 17 वर्षीय अल्पवयीन युवतीने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या (Minor college student commits suicide) केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. संबंधित युवतीने घटनेच्या दिवशी सकाळी कॉलेजला जाण्यासाठी तयारी केली. पण ती कॉलेजला गेली नाही. ती आपल्या राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून कागल पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे. प्रीती श्रीकांत आरेकर असं आत्महत्या करणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन युवतीचं नाव आहे. ती कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथील रहिवासी आहे. तिचे वडील श्रीकांत आरेकर हे प्रसिद्ध फोटोग्राफर आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी सकाळी प्रीतीने कॉलेजला जाण्याची तयारी केली होती. पण ती कॉलेजला गेलीच नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी तिच्या रुममध्ये जाऊन पाहणी केली असता, ती मृतावस्थेत आढळली आहे. हेही वाचा-अंथरुणाला खिळलेल्या तरुणाला बापाने दिला भयंकर मृत्यू; जीव जाईपर्यंत घातले घाव तिने राहत्या घरातील पोटमाळ्यावरील लोखंडी पाईपला ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. आत्महत्येची घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी विजय आरेकर यांनी कागल पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी मृत युवतीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. हेही वाचा-15 वर्षे वनवास भोगला पण शेवटी हरलीच; पतीच्या छळाला कंटाळून उचललं भयावह पाऊल प्रीतीने नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली, याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. प्राथमिक तपासाच्या आधारे कागल पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर पोलिसांनी मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Kolhapur, Suicide

    पुढील बातम्या