Home /News /kolhapur /

बिटकॉईनमधून बक्कळ कमाईचं दाखवलं आमिष, कोल्हापुरातील तरुणाला 16 लाखांना लुबाडलं

बिटकॉईनमधून बक्कळ कमाईचं दाखवलं आमिष, कोल्हापुरातील तरुणाला 16 लाखांना लुबाडलं

Crime in Kolhapur: कोल्हापुरातील एका तरुणाला बिटकॉईनमध्ये गुंतवणूक (Investment in bitcoin) करायला लावून त्याला 16 लाखांना लुबाडलं (16 lakh fraud) आहे. संबंधित तरुणाने या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

    कोल्हापूर, 23 जानेवारी: मागील काही काळापासून क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) आणि शेअर मार्केटमध्ये (Stock market) गुंतवणूक करण्यास सांगून फसवणूक (Fraud) केल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. अलीकडेच बार्शीतील विशाल फटे प्रकरण (Vishal phate case) राज्यभर गाजत आहे. असं असताना आता कोल्हापुरातून एक नवीन फसवणुकीचं प्रकरण समोर आलं आहे. येथील एका तरुणाला बिटकॉईनमध्ये गुंतवणूक (Investment in bitcoin) करायला लावून त्याला 16 लाखांना लुबाडलं (16 lakh fraud) आहे. संबंधित तरुणाने या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी सहा जणांविरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल (FIR Lodged) केला आहे. हिरेन पाटील (रा. अमरावती), मोहमद हबीब मोहमद हनीफ, मोहमदी बेगम जुनैदी (दोघंही रा. गुलबर्गा), मोहमद आब्बास मोहमद युसुफ, हरजैत कौर ऊर्फ जोया युसूफ फारूकी (दोघे रा. अहमदगड, पंजाब), राकेश कुमार शीमंगलरामजी (रा. नई आबादी, मध्य प्रदेश) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहे. या प्रकरणी हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील प्रवीण प्रकाश माळी (35) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलीस तपास करत आहेत. हेही वाचा-अकोला: रक्षकच बनले भक्षक; पोलीस कोठडीत सराफा व्यापाऱ्यावर अनैसर्गिक अत्याचार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित संशयित आरोपींनी कोल्हापुरातील विविध हॉटेलमध्ये ट्रेडिंगबाबत मिटिंग घेऊन लोकांना बक्कळ कमाईचं आमिष दाखवलं होतं. बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेलं असं सांगून आरोपींनी अनेकांना आपल्या जाळ्यात ओढलं होतं. दरम्यान आरोपींनी फिर्यादी माळी यांच्याकडून वेळोवेळी रोख आणि बँक खात्याद्वारे 16 लाख 16 हजार रुपये घेतले होते. फिर्यादीनं यातील काही रक्कम आपल्या नातेवाईकांकडून घेऊन आरोपींना दिली होती. हेही वाचा-महिला वकिलासोबत ATMमध्ये तरुणाचं विकृत कृत्य; नंतर हातातील पैसे घेऊन काढला पळ पण पैसे घेतल्यानंतर आरोपींनी आश्वासनाची पूर्तता केली नाही. शिवाय गुंतवणुकीसाठी वापरलेली वेबसाईट अचानक बंद केली. तसेच गुंतवणूकदारांची  मुद्दलही परत न करता त्यांची फसवणूक केली आहे. हा प्रकार जानेवारी 2021 ते आजपर्यंत घडला आहे. या प्रकरणी प्रवीण माळी यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Kolhapur, Money fraud

    पुढील बातम्या