मराठी बातम्या /बातम्या /india-china /

भारताची शक्ती क्षीण करण्याचा प्रयत्न; जगात पहिल्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या नौदलात काय आहे विशेष?

भारताची शक्ती क्षीण करण्याचा प्रयत्न; जगात पहिल्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या नौदलात काय आहे विशेष?

समुद्रात जगातला सर्वांत बलशाली देश बनवण्यासाठी चीन प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे

समुद्रात जगातला सर्वांत बलशाली देश बनवण्यासाठी चीन प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे

समुद्रात जगातला सर्वांत बलशाली देश बनवण्यासाठी चीन प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे

  • Published by:  Meenal Gangurde

चीनने आपल्या बाजूच्या सर्व देशांच्या जवळ बंदरं आणि नाविक तळ उभारले आहेत. हिंद महासागरातही भारताची शक्ती क्षीण करण्यासाठी चीनचे प्रयत्न सुरू आहेत. अमेरिकी संरक्षण मंत्रालय पेंटॅगॉननी एक धक्कादायक खुलासा केला असून चीनने वाढवलेल्या ताकदीमुळे चीनचं नौदल जगातील क्रमांक 1 चं नौदल झाल्याचं म्हटलं आहे. बघुया तर कसं आहे है नौदल.

समुद्रात वाढवतोय ताकद

समुद्र मार्गाने व्यापार बळकट बनवण्याचा चीनचा इरादा जगजाहीर आहे पण आता त्यांनी दक्षिण चिनी समुद्रातील जवळजवळ 80 टक्के भागावर आपला अधिकार सांगायला सुरुवात केली आहे. चीननी इथं कृत्रिम बंदरही उभारलं आहे. हिंदी महासागरात स्वतः ची शक्ती वाढवण्याचा प्रयत्नही त्यांच्याकडून सुरू आहे. प्रत्यक्ष अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालायने पेंटॅगॉनने पीपल्स लिबरेशन आर्मी नेवी (PLAN)  समुद्री मार्गांवर सर्वांत बलशाली झाल्यांचं म्हटलं आहे ही चिंतेची बाब आहे.

चिनी नौदलाची क्षमता काय आहे

सध्या चिनी नौदलाकडे 350 युद्धनौका आणि पाणबुड्या आहेत. यापैकी अनेक मिसाइल पेट्रोल बोट आहेत. अनेक मल्टी-रोल प्लॅटफॉर्म आहेत. ही जहाजं हवा आणि जमिनीवरून पण युद्ध लढू शकतात. न्युक्लिअर आणि डिझेल इंधनावर चालणाऱ्या 52 पाणबुड्या चीनकडे आहेत. चार बॅलेस्टिक मिसाइल्स आणि दोन एअरक्राफ्ट कॅरिअर्स आहेत.

युद्धनौका अमेरिकेहून जास्त

इंडियन एक्सप्रेसमधील वृत्तानुसार 2020 च्या सुरुवातीला अमेरिकेकडे 293 युद्धनौका आहेत. चीनकडे त्याहून जास्त युद्धनौका आहेत. अमेरिकी युद्धनौकांमध्ये प्रगत तंत्रज्ञान असल्याचं संरक्षण विशेषज्ज्ञांचं मत आहे. अमेरिकेकडे असलेल्या KGN 11 एयरक्राफ्ट कॅरियरपैकी एका कॅरियरवर 80 से 90 फाइटर जेट विमानं तैनात होऊ शकतात.

वेगाने चाललय काम

चीनने नौदलात नव्याने समाविष्ट केलेली जहाजं अमेरिकेच्या जहाजांच्या तुलनेत लहान असली तरीही शत्रूला नष्ट करण्यासाठी त्यावर लाँच ट्युब, मिसाइल या सर्व गोष्टी सज्ज आहेत. अमेरिकेच्या तुलनेत चिनी नौदल जिथं कमी पडतंय त्या सर्व कमतरता भरून काढायचा प्रयत्न वेगाने केला जाता आहे.

विस्ताराची योजना

समुद्रात जगातला सर्वांत बलशाली देश बनवण्यासाठी चीन प्रयत्नशील असल्याचं पेंटागनने मिलिट्री अँड सिक्युरिटी डेव्हलपमेंट्स इनवॉल्विंग द पीपल्स रिपब्लिक ऑफ चाइना-2020 या वार्षिक अहवालात म्हटलं आहे. समुद्रात वर्चस्व निर्माण करण्यासाठी चीन थायलंड, सिंगापूर, इंडोनेशिया, संयुक्त अरब अमिराती, केनिया, सेशल्स, टांझानिया, अंगोला आणि तजाकिस्तानमध्ये आपले तळ तयार करत आहे. चीनने नामिबिया, वनुआतू व सोलोमन बेटावर आधीच कब्जा केला आहे.

हे ही वाचा-भारतानं सोडला लडाख सीमेवर पकडलेला जवान, चिनी सैन्यानं मानले आभार

विवादित समुद्रावर दावा

दक्षिणी चीनचा समुद्र हा जगातील सर्वाधिक विवादात असलेल्या भौगोलिक ठिकाणांपैकी एक आहे. आंतरराष्ट्रीय नियमांनुसार कोणत्याही देशाच्या भूमीपासून समुद्रात 200 नॉटिकल माइलपर्यंत त्या देशाची समुद्री सीमा असते. पण चीन, व्हिएतनाम, फिलिपिन्स आणि मलेशिया यांच्यात असलेल्या दक्षिण चीन समुद्र याबाबत वादात आहे. आशियाच्या अग्नेयेला हा समुद्र असून त्याचं दक्षिण टोक मेनलँड चीनला जोडतं. अग्नेय बाजूने तैवान समुद्रावर आपला दावा करतो. समुद्राच्या पूर्वेला व्हिएतनाम आणि कंबोडिया आहे. पश्चिमेला फिलिपिन्स आहे तसंच उत्तरेला इंडोनेशियाची बेटं आहेत.

वर्चस्वासाठी तयार केली बेटं

हा समुद्री मार्ग अनेक देशांना जोडतो पण व्यस्त असतो. या मार्गावरून दरवर्षी 5 ट्रिलियन डॉलरचा आंतरराष्ट्रीय व्यापार होतो ते जगातील एकूण समुद्री व्यापाराच्या 20 टक्के आहे. या मार्गावर वर्चस्व निर्माण करण्यासाठी चीनने छोटी-छोटी बेटं उभारली आहेत. तिथं चिनी सैन्यही तैनात आहे.

भारताला का धोका

पेंटागनच्या या अहवालात चिनी विस्तारवादाचा भारतालाही धोका आहे असं म्हटलं आहे. त्यानुसार चीन आशियात एकप्रकारे भारताला घेरण्याचा प्रयत्न करतोय. हिंदी  महासागरात चीन बलशाली झाला तर भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो.

भारताची काय तयारी आहे

गलवान खोऱ्यातील तणाव दीर्घकाळ चालेल त्यामुळे भारताने युद्ध टाळण्यासाठी भारत जलमार्गावर आपलं स्थान बळकट करून चीनवर दबाव आणू शकतो. त्यामुळे अंदमान निकोबरा बेटांवर समुद्री तळ उभारण्याला आपण प्राथमिकता देत आहोत. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार अनेक दिवसांपासून हा प्रस्ताव होता पण गलवानच्या प्रकरणानंतर त्याला गती आली आहे.

First published:

Tags: China