राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी दिले घुसखोरीचे आदेश? भारतीय सैन्याचं चीनला जोरदार प्रत्युत्तर

राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी दिले घुसखोरीचे आदेश? भारतीय सैन्याचं चीनला जोरदार प्रत्युत्तर

यापूर्वीसुद्धा चिनी सैन्याने भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता..तेव्हाही सैन्याने त्यांचा टीकाव लागू दिला नाही

  • Share this:

पेइचिंग, 31 ऑगस्ट : गलवान खोऱ्यानंतर चिनी सैनिकांनी पुन्हा भारतीय सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. चीनच्या सैनिकांनी कडक थंडीत अंधाराचा फायदा घेत लडाखमधील पँगोग झीलच्या दक्षिण किनाऱ्यातून भारतीय सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. चीनच्या या कारस्थानाला भारतीय सैन्याने उधळून लावलं. सांगितले जात आहे की, दोन्ही देशांचे हजारो नागरिक या संघर्षात मुकाबला करीत होते. हा हल्ला अशा वेळी झाला जेव्हा काही तासांपूर्वीच चीनचे राष्ट्राध्यक्ष आणि सैन्याचे सर्वोच्च कमांडर क्षी जिनपिंग यांनी तिबेटच्या सुरक्षेबाबत महत्त्वाची बैठक घेतली आणि नवीन निर्देश जारी केले.

चीनने काही तासांपूर्वीच तिबेटबाबत दोन दिवसीय राष्ट्रीय बैठक घेतली. या बैठकीत शी जिनपिंग यांनी तिबेटमध्ये स्थिरता आणि सुरक्षितता याशिवाय भारतालालागून असलेल्या सीमेची रक्षा करण्यासाठी नीती आणि नवीन निर्देश जारी केले आहेत. शी जिनपिंग यांच्या बैठकीनंतर पीपल्स लिबरेशन आर्मीने रणनीतीत महत्त्वपूर्ण पँगोग झीलच्या दक्षिणी तटावर रात्री नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला.

हे वाचा-हवा आणि जमीनच नाही तर समुद्रातही चीनची दादागिरी रोखणार, असा आहे भारताचा प्लॅन

मिळालेल्या माहितीनुसार पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) सैन्याने तयार केलेल्या सहमतीच्या शर्तींचं उल्लंघन करत पूर्व लडाखच्या भागामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. भारतीय सैन्याने चिनी सैन्यांना पांगोंग आणि पांगोंग लेक क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या चीन सैन्याचा डाव उधळून लावला आहे. सध्या तिथल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवणं आणि शांतता पूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही देशांच्या सैन्य दलांमध्ये महत्त्वपूर्ण बैठक सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: August 31, 2020, 4:14 PM IST

ताज्या बातम्या