चीनचं कंबरड मोडलं; टिकटॉकनंतर मोदी सरकारने यावरही आणली बंदी

चीनचं कंबरड मोडलं; टिकटॉकनंतर मोदी सरकारने यावरही आणली बंदी

भारतासह अमेरिकेकडूनही चीनला घेराव घातला जात आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 16 जुलै :  काही दिवसांपूर्वी सुरक्षेच्या कारणास्तव भारत सरकारने चीनच्या 59 अॅप्सवर बंदी आणली आहे. त्यानंतर अमेरिका आणि इतर देशही चीनला घेराव घालत असताना दिसत आहेत. त्यातच भारत सरकारने चीनच्या आणखी एका वस्तूवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे. शेतीमध्ये वापरले जाणारे छोटा ट्रॅक्टरच्या नावाने प्रसिद्ध असलेले पावर टिलर ( Power Tiller) ची मोफत आयात बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने पावर टिलर आणि त्याचे भाग आयात करणे रिस्ट्रिक्टेड विभागात समाविष्ट केले आहे.

याचा अर्थ स्पष्ट आहे की आता सरकारच्या परवानगीशिवाय हे भाग आणि पावर टिलर आयात केला जाऊ शकणार नाही. टिलर हे कृषी मशीन असून याचा उपयोग शेतीत जमीन कसण्यासाठी केला जातो. पावर टिलरच्या भागांमध्ये इंजन, ट्रान्समिशन, चेसिस आणि रोटावेटर समाविष्ट असतात.

काय आहे निर्णय -

विदेश व्यापर महानिदेशालयने अधिसूचनेत म्हटले आहे की पावर टिलर आणि त्याचे भाग याची आयाज नीती बदलण्यात आली असून त्यावर प्रतिबंध लावण्यात आले आहेत. कोणत्याही उत्पादनाला प्रतिबंधित श्रेणीत ठेवणे म्हणजे तत्सम वस्तूची आयात करण्यासाठी डीजीएफटीकडून परवाना घ्यावा लागेल.

हे वाचा-VIDEO इराणने का दिला भारताला धक्का? जगभरातल्या महत्त्वाच्या बातम्या पाहा

दरम्यान पूर्वेकडील लडाख प्रदेशात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेत (LAC) चीनने टँकसह अनेक जड शस्त्रे तैनात केली आहेत, तर आता भारतीय सैन्यानेदेखील सीमेवर आपली क्षमता बळकट करण्याच्या उद्देशाने इस्राइलकडून स्पाइक अंटी-टँक गाइडेड मिसाइल खरेदी करण्याची योजना केली जात आहे. मागील वर्षातील इस्राइलकडून स्पाइक क्षेपणास्त्रांचा हा दुसरी ऑर्डर असेल, कारण यापैकी पहिल्या मिसाइल कराराचा आपात्कालीन अधिकारांतर्गत करार करण्यात आला होता आणि आता त्याला सामील करून उत्तरी कमांडला नियुक्त केले गेले आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: July 16, 2020, 6:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading