शौर्यचक्राने सन्मानित अधिकारी चीनला धडा शिकवणार; राफेलच्या पहिल्या कमांडिंग ऑफिसरला कडक सॅल्यूट

शौर्यचक्राने सन्मानित अधिकारी चीनला धडा शिकवणार; राफेलच्या पहिल्या कमांडिंग ऑफिसरला कडक सॅल्यूट

चीनला धडा शिकवणाऱ्या राफेलची देशातील प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 28 जुलै : फ्रान्सहून भारतात येणाऱ्या 5 राफेल लढाऊ विमान राफेल बुधवारी अंबाला एअरबेसवर पोहोचेल. अधिकृतपणे वायुसेनेमध्ये यांना 15 ऑगस्टनंतर शामील करण्यात येईल. भारतीय वायुसेनाने राफेलच्या स्वागतासाठी पूर्ण तयारी केला आहे.

या दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राफेल स्व्काड्रनचे पहिले कमांडिग ऑफिसर ग्रुप कॅप्टन हरकीरत सिंह होतील. ग्रुप कॅप्टन हरकीरत सिंह हे भारतीय वायुसेनेच्या त्या पायलटच्या टीममध्ये सामील आहेत ज्यांना फ्रान्समध्ये राफेल उडवून आणण्याची जबाबदारी दिली.

हे वाचा-ड्रॅगन काही ऐकेना! अमेरिकेसोबत तणावादरम्यान दक्षिण चीन सागरात लाइव्ह फायर ड्रिल

2009 मध्ये ग्रुप कॅप्टन हरकीरत सिंह यांना शौर्यासाठी शौर्यचक्र पदकाने सन्मानित करण्यात आले होते. हरकीरत सिंह यांनी मिग 21 च्या इंजनमध्ये असलेल्या बिघाडात मोठ्या शौर्याने केवळ स्वत:लाच नव्हे तर मिग-21 लाही जास्त नुकसान होई दिलं नाही. राफेलसाठी अद्याप 15 ते 17 पायलट पूर्णपणे तयार झाले आहेत. अशीही माहिती आहे की अंबाला पोहोचल्यानंतर एका आठवड्यात ते राफेलला ऑपरेशनसाठी तैनात करण्यात येईल.

पाचही राफेल विमानं भारतात आणल्यानंतर अंबाला एअरबेस घेऊन जाणार असून तेथे यांना एअरफोर्समध्ये सामील करण्यात येईल. चीनच्या बॉर्डवर जशी स्थिती झाली आहे, ते पाहता राफेल येताच काम सुरू करण्यात येणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका आठवड्यात मिशनअंतर्गत ही विमानं तयार करण्यात येतील.

राफेल फायटर जेटचं उड्डाण करण्यासाठी एकूण 12 पायलट्सना ट्रेनिंग देण्यात आली आहे. यापैकी काहीजणं राफेल भारतात आणणार आहेत. 29 जुलै रोजी ही विमानं भारतात दाखल होणार असल्याचे सांगितले जात आहे. राफेल 10 तासांचं अंतर पार केल्यानंतर संयुक्त अरब अमीरातमध्ये फ्रान्सच्या एअरबेस अलधफरा येथे लँड करेल. दुसऱ्या दिवशी राफेल अंबालाच्या दिशेने उड्डाण करेल.

Published by: Meenal Gangurde
First published: July 28, 2020, 5:07 PM IST

ताज्या बातम्या