नवी दिल्ली, 19 ऑगस्ट : भारतात एकीकडे चीनच्या उत्पादनांवर (Chinese Goods) बहिष्कार घातला जात असताना दुसरीकडे मात्र चीनची एसयूवी बनविणारी कंपनी मेक इन इंडिया (Make In India) साठी भारतात येणार आहे. या कंपनीचं नाव ग्रेट वॉल मोटर्स आहे. या कंपनीने फेब्रुवारी महिन्यात तेलंगणात जनरल मोटरची एक फॅक्टरी 950 कोटी रुपयांमध्ये खरेदी केली आहे. .
भारतात 7500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना
सांगितले जात आहे की या कंपनीने भारतात जलद गतीने वाढणाऱ्या एसयूवी बाजारात एकूण 1 अरब डॉलर म्हणजे तब्बल 7500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना तयार केली आहे. याअंतर्गत सध्या ही कंपनी भारत सरकार केव्हा चीनच्या कंपन्यांना एफडीआयची परवानही देते, याच्या प्रतीक्षेत आहे. चीनच्या अनेक इतर कंपन्याही हे सर्व फार जवळून पाहत आहेत.
ग्रेट वॉल मोटर्स यांनी उद्योग आणि आंतरिक व्यापार वाढविणारे विभाग आणि कॉम्पटीशन कमीशन ऑफ इंडियाशी चर्चा केली आहे, ज्यानंतर त्या आपल्या गाड्या भारतात लॉन्च करू शकतील. सांगितले जात आहे की ऑटोमोबाइल सेक्टरमध्ये एफडीआय ऑटोमेटिक रूटच्या माध्यमातून केली जाते, मात्र चीनसोबत होणारी प्रत्येक एफडीआयला सरकारी परवानगी मिळविणे अनिवार्य आहे.
हे वाचा-भारतीयांना आत्मनिर्भर नाऱ्याचा विसर; काही सेकंदात चिनी स्मार्टफोनची मोठी विक्री
मिळालेल्या माहितीनुसार तब्बल 40 चिनी गुंतवणूकदार सरकारी परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत. भारतात व्यवसाय करण्याची इच्छा सर्व चिनी कंपन्या ग्रेट वॉल मोटर्स यांच्याकडे लक्ष ठेवून आहे, त्यानंतर त्या कंपन्याही पुढे जाण्याचा प्रयत्न करतील. इतक कंपन्यांसाठी ही एक टेस्ट केसप्रमाणे असेल. भारत-चीनमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या परिस्थितीत भारत या कंपन्यांना कसा प्रतिसाद देतो हे लवकरच समोर येईल.