भारताविरुद्ध चीनचं सायबर वॉर? सरकारने 500 पेक्षा जास्त अकाऊंट्स केले ब्लॉक

भारताविरुद्ध चीनचं सायबर वॉर? सरकारने 500 पेक्षा जास्त अकाऊंट्स केले ब्लॉक

जनमत तयार करणे आणि जनमत घडविण्यासाठी Social Mediaचा मोठा वापर होत असतो. ते अतिशय प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे त्या माध्यमाचा वापर करत चुकीची माहिती पेरण्याचा हा प्रयत्न असू शकतो अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 11 ऑक्टोबर: पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीन (India-China) दरम्यानचा तणाव अजुनही कायम आहे. नियंत्रण रेषेवर (LAC) शांतता निर्माण करण्यासाठी चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरही माहितीचा महापूर आला आहे. बनावट अकाऊंट्स निर्माण करून खोटी, चुकीची माहिती पसरविण्यात येत आहे. असे 500 पेक्षा जास्त अकाऊंट्स सरकारने ब्लॉक केले आहेत. चीनने भारताविरुद्ध सायबर वॉर सुरू केलं असावं अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे.

जनमत तयार करणे आणि जनमत घडविण्यासाठी सोशल मीडियाचा मोठा वापर होत असतो. ते अतिशय प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे त्या माध्यमाचा वापर करत चुकीची माहिती पेरण्याचा हा प्रयत्न असू शकतो अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे.

सरकार आणि सुरक्षा संस्था अशा गोष्टींवर करडी नजर ठेवत असून अशी माहिती पसरविणारे अकाऊंट्स बंद करण्यात येत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दिलेल्या आत्मनिर्भर (Atmanirbhar Bharat ) घोषणेचे आता परिणाम दिसून येत आहेत. 2020-21 या आर्थिक वर्षामध्ये भारत आणि चीनमध्ये असलेली व्यापर तूट तब्बल 50 टक्क्यांनी कमी झाली आहे. चीनला होणारी भारताची निर्यात वाढली असून आयातीचं प्रमाण कमी झालं आहे. त्यामुळे व्यापार तूट घटल्याचं सांगितलं जात आहे. हा चीनला मोठा दणका मानला जात आहे.

भारत आणि चीन सीमेवर असलेला तणाव आणि कोरोनाची महाभयंकर साथ या पार्श्वभीमीवर पंतप्रधान मोदी यांनी आत्मनिर्भर भारताची घोषणा दिली होती. त्यानंतर भारताने चीनच्या Appsवर बंदी घातली. आयात होणाऱ्या चिनी मालावर डंम्पिंग ड्युटी लावली त्यामुळे आयात घटली आहे. भारतात चीन विरोधी वातावरण असल्याने व्यापाऱ्यांनी मालही आयात केला नाही.

याउलट भारताची काही क्षेत्रातली चीनला होणारी निर्यात वाढली आहे. भारताची पोलाद निर्यात तब्बल 8 पट वाढली आहे. त्यामुळेही व्यापार तूट कमी होण्यास फायदा झाला.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 11, 2020, 10:36 PM IST
Tags:

ताज्या बातम्या