Home /News /india-china /

चिनी कंपनीतील भारतीय कर्मचाऱ्याचा धक्कादायक खुलासा; 'अलिबाबा'चे जॅक माला कोर्टाचा समन्स

चिनी कंपनीतील भारतीय कर्मचाऱ्याचा धक्कादायक खुलासा; 'अलिबाबा'चे जॅक माला कोर्टाचा समन्स

या प्रकरणात त्यांनी आपल्या वकिलांच्या माध्यमातून 2,68,000 डॉलर नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

    नवी दिल्ली, 26 जुलै : भारत-चीन सीमा विवादानंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडले आहे. काही दिवसांपूर्वीच भारताने 59 चिनी अॅप्सवर बंदी आणली होती. त्यानंतरही सीमेदरम्यान चीनविरोधात भारताची जोरदार तयारी सुरू आहे. अलिबाबा ग्रुपचे (Alibaba Group)  संस्थापक जॅक मा यांना गुरुग्राममधील एका कोर्टाने समन्स पाठवला आहे. अलिबाबा ग्रुपच्या माजी कर्मचाऱ्याने सांगितले की या कंपनीने त्यांना चुकीच्या पद्धतीने नोकरीवरुन काढून टाकले. कर्मचाऱ्याने सांगितले की त्यांनी कंपनीच्या एका अॅपवर सेन्सॉरशीप आणि फेकन्यूज बाबत आवाज उठवला होता. ज्यानंतर कंपनीने त्याला बाहेर काढले. न्यूज एजन्सी रॉयटरने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे. भारताकडून 59 अॅप्स बंद केल्यानंतर हे प्रकरण समोर आलं आहे. या अॅप्सलाही भारतात बंदी घालण्यात आली आहे. त्यामध्ये अलिबाब ग्रुपचे UC News, UC Browser सामील होते. हे वाचा-8 महिन्यांनंतर उत्तर कोरियात घुसला कोरोना! पहिला रुग्ण सापडताच किम जोंग घाबरले गेल्या 20 जुलै रोजी एका कोर्टात फायलिंगमध्ये अलिबाब यूसी वेबमध्ये काम करणारा माजी कर्मचारी पुष्पेंद्र सिंह परमार याने आरोप लावला आहे की -59 अॅप्स बंद करण्याबाबत कंपनीने सेन्सॉर कॉन्टॅक्टबाबत गोंधळ घातला. 30 दिवसांत लेखी उत्तर गुरुग्राम जिल्हा न्यायालयमध्ये सिव्हिल जज सोनिया शेवकंद यांनी अलीबाब जॅक मा आणि कंपनीशी संबंधित अनेक व्यक्तींना 29 जुलैपर्यंत कोर्टात हजर राहण्याचा समन्स पाठविला आहे. रॉयटर्सने कोर्टाच्या कायदपत्रांच्या हवाल्याने हे सांगितले. जज यांनी कंपनी आणि त्याच्या अधिकाऱ्यांना 30 दिवसांपर्यंत लेखी उत्तर देण्यास सांगण्यात आलं आहे. UC Web च्या कार्यालयात परमार एसोसिएट डायरेक्टर पदावर होते. ते या कंपनीत ऑक्टोबर 2017 पासून काम करीत होते. या प्रकरणात त्यांनी आपल्या वकिलांच्या माध्यमातून 2,68,000 डॉलर नुकसान भरपाईची मागणी केली आहे. युसी ब्राऊजरला भारतात तब्बल 68.9 कोटी वेळा डाऊनलोड करण्यात आले होते. तर यूसी न्यूज 7.98 कोटी वेळा डाऊनलोड करण्यात आला होता. हे आकडा 2017 आणि 2018 मधील आहेत. भारत-चीन सीमा विवादादरम्यान अनेक भारतीय जवानांना वीरमरण आलं. त्यानंतर भारताकडून कारवाई सुरूच आहे. यात अमेरिकाही विविध प्रकारे चीनला धडा शिकवण्याचा प्रयत्न करीत आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या