ड्रॅगनविरोधात घेराव घालत असताना धक्कादायक बातमी; चीनच्या हालचालीमुळे भारत तणावात

ड्रॅगनविरोधात घेराव घालत असताना धक्कादायक बातमी; चीनच्या हालचालीमुळे भारत तणावात

गेल्या अनेक दिवसांपासून भारत विविध प्रकारे चीनला घेराव घालण्याचा प्रयत्न करीत आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 25 जुलै : भारत पुन्हा एकदा उत्तर-पूर्व भागाबाबत चिंतेत सापडला आहे. युरोपच्या एका थिंक टँक अनुसार काही दिवसांपूर्वी म्यानमार-थायलँड सीमावर स्थित ताओ भागात अवैध्य चिनी शस्त्रांना जप्त करण्यात आलं. युरोपीयन फाऊंडेशन फॉर साऊथ एशियन स्टडीजने 23 जून रोजी Irrawadyy मध्ये प्रकाशित एका रिपोर्टचा हवाला देत सांगितले की सुरुवाती तपासात समोर आले की शस्त्रे म्यानमारमधील विद्रोही समूहापर्यंत पोहोचवले जात होते. मात्र या घटनेमुळे नवी दिल्लीत सिक्युरिटी सर्कलमध्येही चिंता वाढवली आहे.

हे वाचा-चीनविरोधात लढणाऱ्या शहीद कर्नल संतोष बाबू यांच्या पत्नी झाल्या डेप्युटी कलेक्टर

म्यानमार-थायलँड बॉर्डरवर जप्त केलेले अनेक शस्त्रांचे चिनी लिंक असल्याची पृष्टी करीत थिंक टँकयांनी सुत्रांचा हवाला देत सांगितले की ही शस्त्र आता अराकन आर्मीसाठी वापरले जात नाहीत. ते स्वत: फायर करू शकत नाही. ताब्यात घेतलेली शस्त्रे खरी असून चीननिर्मित आहेत. या प्रकरणात 20 जुलै रोजी थायलँडमध्ये भारतीय राजदूत सुचित्रा दुरइ यांनी सांगितले की ताक प्रांताचे गर्व्हनर यूसिट संपूथारटसह बैठक होती. जप्त झालेल्या शस्त्रांची माहिती शोधून काढण्यासाठी भारतीय सुरक्षा दल म्यानमारमधील आपल्या समकक्षांशी संपर्कात आहेत.

हे वाचाचीनला धक्का : 72 तासांत दूतावास बंद करण्याच्या अमेरिकेच्या आदेशावर चीनची धमकी

दरम्यान चीनसोबत सुरू असलेल्या सीमा विवादादरम्यान मोदी सरकारने Emergency Powers चा वापर करीत फ्रान्सच्या हॅमर मिसाइल मागविल्या आहेत. पहिल्या टप्प्यातील मिसाइल्स 29 जुलै रोजी भारतात पोहोचतील. या मिसाइल्सनां राफेल विमानांमध्ये लावण्यात येतील. जगातील सर्वात चांगल्या लढाऊ विमानांपैकी राफेलची मारक क्षमता हॅमर मिसाइल्ससह अधिक घातक होईल. हे मिसाइल्स 60 ते 70 किमी लांबपर्यंत निशाणा साधू शकतात.

Published by: Meenal Gangurde
First published: July 25, 2020, 6:52 PM IST

ताज्या बातम्या