Home /News /india-china /

App बंदीचा चायनीज हॅकर्सनी घेतला बदला; Flipkart च्या सेलमध्ये ग्राहकांना केलं टार्गेट

App बंदीचा चायनीज हॅकर्सनी घेतला बदला; Flipkart च्या सेलमध्ये ग्राहकांना केलं टार्गेट

भारत-चीन सीमा विवाद (India-china Dispute) आणि चायनीज अॅप्सवर (China apps) बंदी आणल्यानंतर चायनीज हॅकर्स (Chinese hackers) भारतीयांना त्रास देण्याचा पूरेपूर प्रयत्न करीत आहेत.

    नवी दिल्ली, 19 डिसेंबर : भारत-चीन सीमा विवाद (India-china Dispute) आणि चायनीज अॅप्सवर (China apps) बंदी आणल्यानंतर चायनीज हॅकर्स (Chinese hackers) भारतीयांना त्रास देण्याचा पूरेपूर प्रयत्न करीत आहेत. हॅकिंगच्या माध्यमातून ते भारतीयांना त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलदरम्यान चीनच्या दोन हॅकर्स ग्रुप GuangDong आणि Henan यांनी लोकांची फसवणूक केली आहे. याची माहिती CyberPeace फाउंडेशनच्या एका रिपोर्टमधून मिळाली आहे. Spin The Lucky Wheel बनलं सर्वात मोठं शस्त्र रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, चायनीज हॅकर्सने भारतीय खरेदीदारांना हॅक करण्यासाठी Spin The Lucky Wheel Scam ला आपलं सर्वात मोठं शस्त्र बनवलं आहे. Spin The Lucky Wheel Scam हा एक लकी ड्रॉ असतो. ज्यामध्ये अनेक प्रकारची बक्षीसं दिली जातात. ही हॅकिंग ऑक्टोबरमध्ये फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलदरम्यान झाली आहे. तुम्ही ही गोष्ट वाचून हैराण व्हाल की हॅकर्सने फ्लिपकार्टप्रमाणे अॅमेजॉनच्या नावाने Amazon Big Billion Day Sale चा एक लकी ड्रा तयार केला होता, मात्र अॅमेजॉनच्या सेलचं नाव  द ग्रेट इंडियन फेस्टिवल होतं. या गेमच्या आड हॅकर्स लोकांना 128 जीबी स्टोरेज असलेला  OPPO F17 Pro देण्याचं वचन दिलं होतं. यानंतर लोकांच्या व्हॉट्सअॅपवर संशयित संदेश पाठविण्यात आले आणि ते संदेश मित्र आणि कुटुंबातील लोकांसोबत शेअर करण्यास सांगण्यात आले. मॅसेजसोबत दिलेले सर्व दुवे हे चीनचे होते. अलिबाबाच्या सर्व्हरवर रजिस्टर्ड होता डोमेन रिपोर्टमध्ये दिलं आहे की, हॅकर्सद्वारा शेअर केलेल्या सर्व डोमेन अलीबाब क्लाउड कम्पुटिंग प्लेटफॉर्मवर रजिस्टर्ड होते. 'Spin the Wheel' स्कॅम हॅकिंगची खूप जुनी पद्धत आहे. सोशल मीडियावर कायम तुम्हाला अशा प्रकारचे पोस्ट पाहायला मिळतील. फेस्टिव्ह सेलदरम्यान भारतात ऑनलाइन शॉपिंगबाबत खूप क्रेज असतो. ज्याचा फायदा हे हँकर्स उचलतात.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: India china

    पुढील बातम्या