चीन सीमावादावरून राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप, दिलं थेट आव्हान!

चीन सीमावादावरून राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप, दिलं थेट आव्हान!

' भारताचं परराष्ट्र धोरण पूर्णपणे फसलेलं आहे. या फसलेल्या धोरणामुळेच ही परिस्थिती ओढवली आहे.'

  • Share this:

नवी दिल्ली 23 जून: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सर्वपक्षीय बैठकीत चीनसोबतच्या वादावर (India china border dispute) जे वक्तव्य दिलं होतं त्यामुळे लष्कराला (Indian army) मोठा धक्का बसल्याचा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केला आहे. काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत त्यांनी हा आरोप केला. चीनने भारतीय भूमीवर कब्जा केलेला नाही आणि कुठली पोस्टही घेतलेली नाही असं वक्तव्य मोदींनी केलं होतं. राहुल गांधी म्हणाले, चीनने निर्लज्जपणे भारताच्या भूमिवर ताबा मिळवलेला आहे. पंतप्रधांनांच्या या वक्तव्यामुळे अतिशय गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोपही त्यांनी केला.

या वादावर खरी परिस्थिती काय आहे हे पंतप्रधानांनी जनतेला स्पष्ट करावं असं आव्हानही त्यांनी दिलं. भारताचं परराष्ट्र धोरण पूर्णपणे फसलेलं आहे. या फसलेल्या धोरणामुळेच ही परिस्थिती ओढावल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत मोदींवर करण्यात येणाऱ्या टीकेवरूनही मतभेद झाल्याची माहिती समोर आलीय.

थेट मोदींवर टीका न करता त्यांच्या धोरणांवर टीका करावी असं मत एका नेत्याने व्यक्त केलं. त्यावर प्रियंका गांधी यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

चिनी वस्तूंवर बहिष्कारावर अजित पवार म्हणतात, 'सव्वाशे कोटी जनतेनं ठरवलं तर ...'

दरम्यान, चीनशी झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्कर प्रमुख जनरल मनोज एमएम नरवणे मंगळवारी लडाख येथे दाखल झाले. त्यांनी प्रथम लेह येथील सैनिक रुग्णालयात जवानांची भेट घेतली. येथील त्यांचा दौरा दोन दिवसांचा आहे.

दिल्लीतील सैन्य कमांडरांच्या परिषदेत हजर झाल्यानंतर ते लेहला रवाना झाले. लडाखमधील उत्तर आर्मीचे कमांडर लेफ्टनंट जनरल वाय.के. जोशी यांच्याशी ते ऑपरेशनल तयारीचा आढावा घेतील. याशिवाय लष्करप्रमुख ग्राउंड कमांडर्ससमवेत डेडलॉकबाबत चर्चा करतील आणि पुढच्या ठिकाणांना भेट देतील.

मोठा खुलासाः गलवान खोऱ्यात भारतीय सैन्यावर हल्ला करण्याचा चीननेच दिला होता आदेश

सोमवारी मोल्डो येथे दोन्ही पक्षांमध्ये 11 तास लष्करी कमांडर-स्तरीय संभाषण झाले. गलवान, पेनगँग त्सो आणि हॉट स्प्रिंगवर जोपर्यंत 2 मे पूर्वीची परिस्थिती निर्माण होत नाही, तोपर्यंत नियंत्रण रेषेवरील परिस्थिती नाजूक राहील, असे भारताने ठामपणे सांगितले आहे.

संपादन - अजय कौटिकवार

 

 

First published: June 23, 2020, 5:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading