Home /News /india-china /

सीमेवर तणाव असताना चिनी सैनिकाचा भारतीय हद्दीत प्रवेश, लष्कराने घेतलं ताब्यात

सीमेवर तणाव असताना चिनी सैनिकाचा भारतीय हद्दीत प्रवेश, लष्कराने घेतलं ताब्यात

हे संकट नैसर्गिक असून त्याचा लष्कर समर्थपणे मुकाबलाही करत आहे. लडाख आणि परिसरात आता बर्फवृष्टीला सुरूवात झाली आहे. तापमान -20 डिग्री एवढं असून हाडं गोठविणाऱ्या या थंडाचा मुकाबला करण्यासाठी सैनिक सज्ज झाले आहेत.

हे संकट नैसर्गिक असून त्याचा लष्कर समर्थपणे मुकाबलाही करत आहे. लडाख आणि परिसरात आता बर्फवृष्टीला सुरूवात झाली आहे. तापमान -20 डिग्री एवढं असून हाडं गोठविणाऱ्या या थंडाचा मुकाबला करण्यासाठी सैनिक सज्ज झाले आहेत.

सीमावर्ती भागात गुप्त माहिती काढण्यासाठी हेरगिरीच्या उद्देशानेही सैनिक अशी कामं करत असतात. त्यामुळे लष्करी अधिकारी सखोल चौकशी करत आहेत.

    लडाख 19 ऑक्टोबर: सीमेवर तणाव असताना एका चिनी सैनिकाने भारतीय हद्दीत प्रवेश केल्याची घटना घडलीय. त्या सैनिकाला भारतीय लष्कराने ताब्यात घेतलं आहे. ताब्यात असलेल्या सैनिकाची चौकशी सुरू असल्याची माहिती लष्करी सूत्रांनी दिली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून लडाखच्या सीमेजवळ दोन्ही देशांदरम्यान तणाव आहे. चिनी सैनिकांना अनेकदा भारतीय हद्दीत अतिक्रमण करण्याचा प्रयत्नही केला होता. भारताने हे सर्व प्रयत्न हाणून पाडले होते. रविवारी रात्री हा चिनी सैनिक भारतीय हद्दीत आला होता. त्यावेळी त्याला भारतीय सैनिकांनी ताब्यात घेतलं. त्याच्याजवळ लष्कराचं ओळखपत्र आणि इतर काही कागदपत्र आहेत. त्याच्याकडे कुठलंही शस्त्र सापडलेलं नाही. लडाखमधल्या देमचौक या भागात हा सेनिक सापडला आहे. आपला याक हरवला आहे आणि त्याचा शोध घेत असताना आपण चुकून भारतीय हद्दीत आल्याचं हा चिनी सैनिक सांगतो आहे. त्याचा उद्देश जर गुप्त माहिती काढण्याचा किंवा घातपाताचा नव्हता असं सिद्ध झालं तर त्याला लष्करी नियमांप्रमाणे चीनकडे सोपवलं जाणार आहे. सीमावर्ती भागात गुप्त माहिती काढण्यासाठी हेरगिरीच्या उद्देशानेही सैनिक अशी कामं करत असतात. त्यामुळे लष्करी अधिकारी सखोल चौकशी करत आहेत. दरम्यान, त्या चिनी सैनिकाचं नाव वांग या लोंग असल्याचं लष्कराने म्हटलं आहे. तो हरवला असल्याचं चिनी लष्कराने कळवलं होतं. त्याची चौकशी करण्यात आली असून लष्करी नियमांप्रमाणे त्याला चिनी लष्कराच्या स्वाधिन करण्यात येणार आहे. या सैनिकाला वैद्यकीय उपचार, अन्न आणि गरम कपडेही पुरविण्यात आल्याचं लष्कराने म्हटलं आहे. लडाखमधल्या चीन सीमेवरचा तणाव अजुनही कायम आहे. भारत आणि चीन यांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत मात्र त्यातून काहीही तोडगा निघत नाही. चीन आडमुठी भूमिका घेत असून सतत कुरापती काढण्याचं काम सुरू आहे. चीनच्या विश्वासघातकीपणाचा अनुभव असल्याने भारतीय लष्कराने आता सर्व तयारी सुरू केली आहे. युद्धाचा प्रसंग आलाच तर लष्कर आणि हवाई दल एकाच वेळी आघाडी सांभाळणार असून कशा प्रकारे सामना करायचा याचा Action Plan तयार झाल्याची माहिती लष्करी सूत्रांनी दिली आहे. India-China Dispute: भारतच नाही, या 21 देशांसोबत चीनचा सीमा प्रश्न दहा महिन्यांपूर्वीच केंद्र सरकारने ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ हे नवे पद तयार केलं होतं. माजी लष्कर प्रमुख बिपीन रावत यांची CDS म्हणून नियुक्तीही केली आहे. रावत तसेच लष्कर प्रमुख मनोज नरवणे आणी हवाईदल प्रमुख आरकेएस भदौरीया यांच्या बैठकाही होत आहेत.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    पुढील बातम्या