मराठी बातम्या /बातम्या /india-china /पाकिस्तानचं घृणास्पद कृत्य; हिंदू आणि ख्रिश्चन महिलांची चीनमध्ये केली जातेय विक्री

पाकिस्तानचं घृणास्पद कृत्य; हिंदू आणि ख्रिश्चन महिलांची चीनमध्ये केली जातेय विक्री

लग्नाच्या नावाखाली या तरुणींची चीनमधील पुरुषांना विक्री केली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे

लग्नाच्या नावाखाली या तरुणींची चीनमधील पुरुषांना विक्री केली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे

लग्नाच्या नावाखाली या तरुणींची चीनमधील पुरुषांना विक्री केली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे

नवी दिल्ली, 10 डिसेंबर : नेहमीच वादात सापडणारा पाकिस्तान आता आणखी एका संकटात सापडला आहे. आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्यासाठी अमेरिकेचे सर्वोच्च मुत्सद्दी सॅम्युअल ब्राउनबॅक यांनी दावा केला आहे की, पाकिस्तान हिंदू आणि ख्रिश्चन महिलांना चीनमध्ये पाठवून वाईट वागणुकी दिली जात आहे. अनेकदा त्यांचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जात आहे. काही वेळेस तर त्यांचे मनाविरोधात लग्न लावून दिले जाते..तर काही वेळेस लग्नानंतर पुरुषासोबत महिलेला ठेवलं जातं.

ब्राउनबॅक यांनी मंगळवारी अशा प्रकारच्या वृत्तांबद्दल सांगितले की धार्मिक अल्पसंख्याक, ख्रिश्चन आणि हिंदू महिलांचा वापर चीनमधील पुरुषांच्या मनोरंजनासाठी केला जात आहे. तेथे त्यांना उपपत्नी लग्नानंतर पुरुषासोबत म्हणून ठेवले जाते. आणि या महिलांचे चीनमध्ये जबरदस्तीने लग्न लावून दिले जाते. या महिला प्रामुख्याने पाकिस्तानातून आलेल्या आहेत. ते म्हणाले की या माध्यमातून धार्मिक अल्पसंख्यांकांविरुद्ध भेदभाव केला जात आहे, ज्यामुळे त्यांची परिस्थिती आणखी बिघडू शकते. ते पुढे म्हणाले की, आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य कायद्यांतर्गत पाकिस्तानला विशेष चिंतेचा देश (सीपीसी) म्हणून घोषित केली जाण्याची गरज आहे.

हे ही वाचा-अमेरिकेच्या रिपोर्टमध्ये चीनचा डाव उघड, या 2 कारणांसाठी भारतासोबत केला तणाव

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये एका वृत्तसंस्थेने 629 पाकिस्तानी महिला आणि तरुणींची यादी प्रसिद्ध केली होती. ज्या तरुणींना चिनी पुरुषांना नववधू म्हणून विकल्या गेल्या होत्या. या महिलांना 2018 ते 2019 च्या दरम्यान जबरदस्तीने चीनमध्ये नेण्यात आले. ही यादी पाकिस्तानच्या तपास यंत्रणांनी तयार केली होती.

दरम्यान गेल्या जवळपास वर्षभरापासून भारत आणि चीनच्या सीमेवर (Indo-China Border) तणाव आहे. चीनने (China Government) हा तणाव का निर्माण केला हे आता स्पष्ट झालं आहे. अमेरिकेच्या एका महत्त्वाच्या आयोगाने चीनचा खरा डाव उघड केला आहे. विशिष्ट उद्दीष्ट समोर ठेवून चीन सरकारने जाणीवपूर्वक भारतासोबत तणाव निर्माण केल्याचं या अहवालात म्हटलं आहे. केवळ भारतासोबतच नाही तर जपानसह अनेक देशांसोबतच्या सीमांवर चीनने आक्रमक धोरण स्वीकारत वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. लडाख जवळच्या गलवान (Galwan) खोऱ्यात घटनेची हिंसक घटना ही त्याचाच एक प्रकार असल्याचंही या अहवालात सांगण्यात आलं आहे.

First published:

Tags: China, Pakistan