मराठी बातम्या /बातम्या /india-china /

गर्लफ्रेंडच्या मोबाइलमधील या एका गोष्टीमुळे आरोपीचा भांडाफोड; अखेर चिनी नागरिक गजाआड

गर्लफ्रेंडच्या मोबाइलमधील या एका गोष्टीमुळे आरोपीचा भांडाफोड; अखेर चिनी नागरिक गजाआड

हा आरोपी पोलिसांच्या नजरेआड पळ काढण्याच्या तयारीत होता. तो विमानतळापर्यंतही पोहोचला होता..मात्र..

हा आरोपी पोलिसांच्या नजरेआड पळ काढण्याच्या तयारीत होता. तो विमानतळापर्यंतही पोहोचला होता..मात्र..

हा आरोपी पोलिसांच्या नजरेआड पळ काढण्याच्या तयारीत होता. तो विमानतळापर्यंतही पोहोचला होता..मात्र..

  • Published by:  Meenal Gangurde
हैदराबाद/गुरुग्राम, 1 जानेवारी : बनावटी अ‍ॅप्सच्या माध्यमातून कर्ज वितरण करणार्‍या कंपन्यांवर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर पोलिसांनी आता या प्रकरणात एका चिनी नागरिकाला (China) दिल्ली विमानतळावरून अटक केली आहे. अटक केलेल्या चिनी नागरिकाचे नाव जू वी उर्फ ​​लोम्बो असे आहे. दिल्ली विमानतळावरून फ्रॅंकफर्टकडे जाण्यासाठी विमानात बसायला जात असताना पोलिसांनी त्याला अटक केली. विशेष म्हणजे पोलिसांना लोम्बोच्या पासपोर्टची माहिती त्याच्याच कॉल सेंटरच्या एका महिला कर्मचार्‍याकडून मिळाली आहे. तपासात ही महिला कर्मचारी आणि लोम्बो एकत्र असल्याचं समोर आलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी गुडगाव, बंगळुरु आणि हैद्राबादमधील कॉल सेंटर्समध्ये छापेमारीनंतर पोलिसांनी लोम्बोचा तपास सुरू केला होता. लोम्बो लोन घोटाळ्याच्या पॅरेंट कंपनीचा ऑपरेशनल हेड आहे आणि तो गेल्या काही दिवसांपासून गायब होता. पोलिसांनी छापेमारीदरम्यान गुडगावमधील एका महिला कर्मचारी आणि लोम्बोमध्ये नातेसंबंध असल्याची माहिती मिळाली. या महिला कर्मचाऱ्याच्या फोनमध्ये लोम्बोच्या पासपोर्टचा एक फोटो होता. चौकशीदरम्यान पोलिसांनी एअरपोर्टपासून सर्व ठिकाणांवर लोम्बोच्या या पासपोर्टचा फोटो वितरित केला. हे ही वाचा-मुलगा जगातील सर्वात विकसित देशाचा PM...वडिलांनी मागितलं दुसऱ्या देशाचं नागरिकत्व एअरपोर्टवर पासपोर्टमुळे झाला खुलासा बुधवारी जेव्हा लोम्बो एअरपोर्टवर फ्लाइट पकडण्यासाठी पोहोचला, तेव्हा त्याच्या पासपोर्टवरील तपशीलामुळे एअरपोर्ट सिक्युरिटी ऑफिसरने त्याला ओळखले. यानंतर पोलिसांच्या मदतीने त्याला अटक करण्यात आली व चौकशी सुरू केला. त्यावेळी लोम्बोने त्याला इंग्रजी येत नसल्याचा दावा केला. त्यानंतर मात्र अधिकाऱ्यांनी गुगल ट्रान्सलेटरच्या माध्यमातून लोम्बोची चौकशी केला आणि त्याला ताब्यात घेतलं.
First published:

Tags: India china

पुढील बातम्या