Home /News /india-china /

खरंच एव्हरेस्टची उंची वाढली आहे का? नेपाळ-चीनने दिलं एकत्रित निवेदन, पण भारताची चिंता वाढली

खरंच एव्हरेस्टची उंची वाढली आहे का? नेपाळ-चीनने दिलं एकत्रित निवेदन, पण भारताची चिंता वाढली

नेपाळ (Nepal) आणि चीनने (China) मंगळवारी संयुक्तरित्या निवेदन काढून माउंट एव्हरेस्टच्या (Mt Everest )उंचीत 86 सेंटीमीटरने (जवळपास 3 फूट) वाढल्याचं जाहीर केलं. पण यामुळे भारताची चिंता का वाढली आहे?

    नवी दिल्ली, 9 डिसेंबर : जगातील सर्वात उंच असलेल्या माउंट एव्हरेस्टच्या (Mount Everest) उंचीत बदल झाला असून ती नव्याने नोंदवण्यात आली आहे. 1954 मध्ये भारताने (India) नोंदलेल्या उंचीपेक्षा  माउंट एव्हरेस्टच्या उंचीत 86 सेंटीमीटरने (सुमारे2.8 फूट)  वाढ झाली असून ती आता समुद्रसपाटीपासून 8,848.86 मीटर झाली आहे, असा दावा नेपाळ (Nepal) आणि चीनने (China) संयुक्तरित्या केला आहे. केवळ 66 वर्षात माऊंट एव्हरेस्ट ची  2.8 फूट एव्हडी वाढ खरंच झाली असेल का हा एक संशोधनाचा विषय आहे. तरी चीन आणि नेपाळने केलेल्या या घोषणेत  किती तथ्य आहे याचा अंदाज लावणं कठीण आहे. खरंच एव्हरेस्टीची उंची वाढलीय? नेपाळ (Nepal) आणि चीनच्या (China) म्हणण्यानुसार, 1954 मध्ये सर्व्ह ऑफ इंडियाने केलेल्या मोजणीनंतरच्या काळात एव्हरेस्टच्या (Mount Everest) उंचीत 86 सेंटीमीटरने वाढ झाली आहे. गेल्या काही दशकांपासून भूकंप तसेच अन्य नैसर्गिक कारणांमुळे एव्हरेस्टच्या उंचीत वाढ झाल्याची चर्चा होती. या चर्चांच्या तसंच 2015 मध्ये नेपाळमध्ये झालेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर नेपाळ (Nepal) सरकारने या पर्वताची उंची मोजण्याचा निर्णय घेतला. परंतु, चीन (china) आणि नेपाळ (Nepal) दरम्यान विस्तार असल्याने या पर्वताची उंची हा नेहमीच वादाचा विषय ठरला आहे. यापूर्वी वाढली होती उंची? 1954 मध्ये भारताने (India) या पर्वताची जाहीर केलेली 8,848 मीटर ही उंची जगाने स्वीकारली होती. त्यानंतर युनायटेड स्टेटसमधील नॅशनल जिओग्राफिक सोसायटीने केलेल्या सर्व्हेनुसार माउंट एव्हरेस्टची (Mount Everewst) उंची अधिक असून ती 8850 मीटर्स असल्याचे दिसून आले. परंतु, चीनने हा सर्व्हे स्विकारला नाही. चीनने (china) यापुर्वी केलेल्या मापनानुसार माउंट एव्हरेस्टची उंची 8844.43 मीटर्स असून भारताने केलेल्या आकडेवारीच्या तुलनेत ती चार मीटर्सने कमी आहे. नेपाळ आणि चीन नव्या उंचीवर कसे पोहोचले? नेपाळ (Nepal) आणि चीनने (China) 1961 मध्ये माउंट एव्हरेस्ट जवळून जाणाऱ्या आपल्या सीमारेषांचा प्रश्न सोडवला. त्यानंतर नव्या घोषणेनुसार या देशांनी नेपाळचा (Nepal) माउंट एव्हरेस्टमध्ये असलेला वाटा आणि उंचीबाबत सहमती दर्शवली. चायनीज सर्वेक्षकांनी वैज्ञानिकदृष्ट्या संशोधन करीत सहा वेळा माउंट एव्हरेस्टची उंची मोजली. त्यानंतर दोन वेळा म्हणजेच 1975 आणि 2005 मध्ये एव्हरेस्टची नवी उंची जाहिर केली. त्यानुसार ही उंची अनुक्रमे 8848.13 आणि 8844.43 मीटर्स अशी होती. मात्र आता पहिल्यांदाच एव्हरेस्टच्या उंचीबाबत नेपाळ आणि चीनमध्ये एकमत झाल्याचे दिसून येत आहे. वास्तविक नेपाळ आणि चीनने एव्हरेस्टच्या उंचीबाबत स्वतंत्ररित्या अभ्यास केला असला तरी हे दोन्ही देश एकाच निष्कर्षावर पोहोचले आहेत. नेपाळने गेल्यावर्षी तर चीनने या वर्षाच्या सुरुवातीला एव्हरेस्टबाबत अभ्यास केला. नुकताच दोन देशांदरम्यान एव्हरेस्टच्या नव्या उंचीबाबत सामंजस्य करार (MoU) झाला आहे. एव्हरेस्टची उंची बदलण्यामागे काय दडलंय? 28 एप्रिल 1960 मध्ये चीन आणि नेपाळने या दोन देशांना विभक्त करणाऱ्या सीमेला अधिकृत मान्यता देण्यासाठी शांतता व मैत्रीच्या करारवर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. 1959 मध्ये झालेल्या तिबेटी नागरिकांच्या विद्रोहानंतर एक परोपकारी आशियाई देश अशी आपली प्रतिमा उंचवण्यासाठी चीनने (China) हा करार केल्याचे समीक्षकांचे मत असले तरी गेल्या पाच दशकांत दोन्ही देशांदरम्यान शांतता (Peace) आणि मुत्सद्दीपणा दिसून आला आहे. सप्टेंबरमधील अहवालानुसार, चीनने नेपाळमधील लिमी आफ हुमला येथे नऊ इमारती बांधत नेपाळच्या भुमीवर अतिक्रमण केले. त्यामुळे काठमांडूतील (Kathmandu) चीनच्या दुतावासासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. नोव्हेंबरमध्ये चीनचे संरक्षणमंत्री वे फेंगे यांनी नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांची भेट घेऊन परस्पर हितसंबंधांच्या मुद्द्यावर चर्चा केली. या सर्व तणावाच्या पार्श्वभूमीवर एव्हरेस्टच्या नव्या उंचीसंदर्भात करण्यात आलेला करार शेजारील अन्य राष्ट्रांसाठी डिप्लोमॅटिक बफर म्हणून काम करण्याची शक्यता आहेत. माऊंट एवरेस्टची वाढलेली उंची चीन-नेपाळचा भारत विरोधी कट? चीन आणि नेपाळ या दोन्ही देशांनी या ऐतिहासिक घोषणेचे कौतुक केले असून माउंट एव्हरेस्ट हे चीनशी संबंधाचे जुने प्रतीक असल्याचे म्हणले आहे. या घोषणेमुळे नेपाळबरोबर सामरिक भागीदारीच्या नव्या युगाची सुरुवात झाली असल्याचे चीनने म्हणले आहे. चीनचा नेपाळमधील वाढता हस्तक्षेप पाहता माउंट एव्हरेस्टच्या उंचीबाबत आलेले वृत्त भारतासाठी आश्चर्यकारक नाही. मात्र भारताला यामुळे हिमालयीन राष्ट्रांसोबत राजनैतिक संबंध बळकट करण्यासाठी अडचणीचे ठरु शकते. आतापर्यंत भारत आणि नेपाळने विविध करारांव्दारे शांतता कायम ठेवली असली तरी अलीकडच्या काळात या दोन्ही देशांचे संबंध बिघडताना दिसत आहेत. भारत-चीन (India-China) दरम्यान असलेले तणावाचे संबंध पाहता चीनने केलेली ही घोषणा आगामी काळात विचार करायला लावणारी आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: India china, Nepal

    पुढील बातम्या