गलवान खोऱ्यात चीनविरोधात लढणाऱ्या शहीद कर्नल संतोष बाबू यांच्या पत्नी झाल्या डेप्युटी कलेक्टर

गलवान खोऱ्यात चीनविरोधात लढणाऱ्या शहीद कर्नल संतोष बाबू यांच्या पत्नी झाल्या डेप्युटी कलेक्टर

15 जून रोजी गलवान खोऱ्यात चिनी सैन्यासोबत झालेल्या चकमकीत 20 जवान शहीद झाले होते. यावेळी कर्नल संतोष बाबू यांनाही वीरमरण आलं.

  • Share this:

बंगळुरु, 22 जुलै : 15 जून रोजी गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांविरोधात झालेल्या चकमकीत वीरमरण आलेल्या कर्नल संतोष बाबू यांची पत्नी संतोषी यांनी तेलंगणा सरकारने डेप्युटी कलेक्टरच्या पदी नियुक्त केलं आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी बुधवारी कर्नल संतोष बाबू यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली, आणि त्यांची पत्नी संतोषी यांना डेप्युटी कलेक्टर नियुक्तीचे पत्र सोपवलं.

सीएम के चंद्रशेखर राव यांनी अधिकाऱ्यांनी निर्देश दिले आहेत की संतोषी यांची पोस्टिंग हैद्राबाद वा जवळील परिसरात होईल. सीएम केसीआर यांनी कर्नल बाबू यांच्या कुटुंबीयांच्या सह भोजनही केलं.

कर्नल संतोष बाबू यांची पत्नी संतोषी आपली 8 वर्षांची मुलगी आणि 3 वर्षांच्या मुलासह दिल्लीत राहतात. संतोषी यांची आई हैद्राबादला राहते. कर्नल संतोष बाबू यांना वीरमरण आल्यानंतर तेलंगणा सरकारने कर्नल संतोष बाबू यांच्या कुटुंबीयांना 5 कोटी रुपयांची सन्मान निधी देण्याची घोषणा केली होती.

हे वाचा-चीनविरोधात 'पुणेरी स्टाईल' बॅनर; ‘परदेशी जातीचे कुत्रे व चिनी माणसांना बंदी'

याशिवाय संतोषी बाबू यांना काही जमिनही देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. 15 जून रोजी गलवान खोऱ्यात चिनी सैन्यासोबत झालेल्या चकमकीत 20 जवान शहीद झाले होते. यावेळी कर्नल संतोष बाबू यांनाही वीरमरण आलं. त्या घटनेनंतर देशभरात चीनविरोधात आक्रोश व्यक्त केला जात होता. अनेकांनी चिनी वस्तूंवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: July 22, 2020, 8:38 PM IST

ताज्या बातम्या