• Home
 • »
 • News
 • »
 • india-china
 • »
 • LIVE: भारतीय लष्कराने दाखवली ताकद, चीनविरोधात उंच ठिकाणावर मिळवला ताबा

LIVE: भारतीय लष्कराने दाखवली ताकद, चीनविरोधात उंच ठिकाणावर मिळवला ताबा

राज्यासह देशभरातील कोरोनाचे अपडेट्स आणि महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.

 • News18 Lokmat
 • | September 10, 2020, 22:56 IST
  LAST UPDATED 2 YEARS AGO

  हाइलाइट्स

  22:46 (IST)

  भारतीय लष्कराने दाखवली ताकद दाखवत गुरूवारी चीनविरोधात एका उंच ठिकाणावर ताबा मिळवला. पँगोंग त्सो लेकच्या जवळ फिंगर 4 भागातील उंच ठिकाणावर ताबा मिळवला. व्ह्युरचनात्मक दुष्टीने ही जागा चीन विरोधात महत्त्वाची आहे.

  22:11 (IST)

  पुण्यात दिवसभरात 1916 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ
  पुण्यात दिवसभरात 1838 रुग्णांना डिस्चार्ज
  पुण्यात आज 43 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू
  पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 16,712

  22:8 (IST)

  पुणे - जम्बो रुग्णालयात 50 ऑक्सिजन बेड तयार, जम्बो रुग्णालयात नवीन कोरोना रुग्णांना प्रवेश सुरू, 11 आणि 15 केएल लिक्विड ऑक्सिजनच्या 2 टाक्या सज्ज, शुक्रवारपर्यंत 85 ऑक्सिजन बेड तयार होणार, 'जम्बो'मध्ये 5 दिवसांत 66 कोरोना रुग्ण बरे झाले

  21:59 (IST)

  नागपूर जिल्ह्यात आज 1 हजार 934 कोरोनाचे रुग्ण
  नागपूर जिल्ह्यात आज कोरोनामुळे 58 रुग्णांचा मृत्यू
  नागपुरात आज 1513 रुग्णांची कोरोनावर मात

  सांगली जिल्ह्यात आज रेकॉर्डब्रेक 1174 रुग्णांची भर
  सांगली जिल्ह्यात आज कोरोनामुळे 27 रुग्णांचा मृत्यू
  सांगली जिल्ह्यात आज बरं झालेली रुग्णसंख्या 10747

  21:58 (IST)

  अमरावती - दहीगाव फाट्यावर वीज पडून बापलेकाचा मृत्यू, चांदूरबाजार-आसेगाव मार्गावरील घटना

  21:58 (IST)

  अमरावती - दहीगाव फाट्यावर वीज पडून बापलेकाचा मृत्यू, चांदूरबाजार-आसेगाव मार्गावरील घटना

  21:22 (IST)

  देवेंद्र फडणवीस बिहार निवडणुकीसाठी भाजपचे प्रभारी

  तयारीसाठी फडणवीस मुंबईहून पाटण्याला रवाना

  पुढचे 3/4 दिवस फडणवीस बिहारमध्ये असणार

  पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हेदेखील बिहारमध्ये असतील

  यावेळी हे दोघे नेते निवडणूक व्यूहरचनेविषयी एकत्रित चर्चा करणार

  21:16 (IST)

  मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीची झाली बैठक
  मुख्यमंत्री ठाकरेंच्या उपस्थितीत 'वर्षा'वर पार पडली बैठक
  उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाणही होते उपस्थित
  थोरात, शिंदे, वळसे पाटील, वडेट्टीवार होते उपस्थित
  सुप्रीम कोर्टाच्या अंतरिम आदेशावर बैठकीत चर्चा
  पुढील रणनीतीबद्दल उपलब्ध कायदेशीर पर्यायांवर विचारविनिमय
  यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यापूर्वी चर्चा करण्याचा निर्णय
  मराठा समाजातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार
  वकील मंडळी, अभ्यासक-जाणकारांशी चर्चा करण्याचा निर्णय
  मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्या दु.4 वा. व्हीसीद्वारे बैठक
  मराठा समाजानं संयम बाळगावा -अशोक चव्हाण
  सुप्रीम कोर्टाचा आदेश अंतरिम आहे -अशोक चव्हाण
  सरकार योग्य ती पुढील कार्यवाही करणार -अशोक चव्हाण
  'कोणीही निराश होऊ नये, टोकाचं पाऊल उचलू नये'
  उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांची विनंती
  'काही मंडळींकडून जाणीवपूर्वक दिशाभूल करण्याचा प्रयत्न'
  मराठा समाजाला संयम बाळगण्याचं चव्हाणांचं आवाहन

  20:46 (IST)

  महाराष्ट्रात कोरोनाच्या प्रादुर्भावाचा उद्रेक
  सलग आठवडा प्रतिदिन 20 हजारांपेक्षा अधिक रुग्ण
  सलग दुसऱ्या दिवशी 23 हजार कोरोनाबाधित रुग्ण
  राज्यात आज कोरोनाच्या 23,446 नव्या रुग्णांची नोंद
  राज्यात आज कोरोनामुळे 448 रुग्णांचा मृत्यू
  राज्यात आज 14 हजार 253 रुग्णांची कोरोनावर मात
  राज्यातील रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 70.72 टक्के
  सापडलेल्या आणि बरं होण्याच्या रुग्णसंख्येत तफावत

  20:46 (IST)

  पिंपरी-चिंचवडमध्ये  कोरोनाचे आज तब्बल 1,298 रुग्ण
  पिंपरी-चिंचवडमध्ये आज 19 रुग्णांचा मृत्यू, 557 कोरोनामुक्त

  मुंबई, 10 सप्टेंबर : राज्यासह देशभरातील कोरोनाचे अपडेट्स आणि महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.