मराठी बातम्या /बातम्या /india-china /

पूर्व लडाखमधील तणावानंतर LAC वर भारतानं वाढवली ताकद, सैन्य हाय अलर्टवर

पूर्व लडाखमधील तणावानंतर LAC वर भारतानं वाढवली ताकद, सैन्य हाय अलर्टवर

चीनला दणका; लडाखमधील Strategic height वर भारताच्या ताब्यात, सैन्य हाय अलर्टवर

चीनला दणका; लडाखमधील Strategic height वर भारताच्या ताब्यात, सैन्य हाय अलर्टवर

चीनला दणका; लडाखमधील Strategic height वर भारताच्या ताब्यात, सैन्य हाय अलर्टवर

    लडाख, 01 सप्टेंबर : मुजोर चीननं पुन्हा एकदा सीमारेषा ओलांडून भारतात घुसण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचा डाव जवानांनी उधळून लावला आहे. पूर्व लडाखमध्ये गलवान खोऱ्यातील प्रकरणानंतर शांततापूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयत्न केले जात होते मात्र चीनकडून सतत्यानं कुरापती सुरूच आहेत. गॅलवान व्हॅलीच्या हिंसाचारानंतर दोन्ही देशांमध्ये संघर्षोत्तर बैठका झालेल्या अनेक फेऱ्या झाल्या आणि संघर्ष तीन ठिकाणी संपला. चीननं पैंगोग त्सो झील परिसरात पुन्हा एकदा अंधाराचा फायदा घेऊन घुसखोरीचा प्रयत्न केला मात्र जवानांनी हा घुसखोरीचा डाव उधळून लावला. या घटनेनंतर दोन्ही देशांमधील तणाव पुन्हा वाढला आहे. अरुणाचल ते लडाख या संपूर्ण भागात सैन्याला हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. हे वाचा-राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी दिले घुसखोरीचे आदेश? भारतीय सैन्याने डाव उधळला दरम्यान सॅटलाइन फोटोमधून पूर्व लडाखमध्ये चीनच्या भागात हेलिपॅड तयार करण्यात आल्याचे फोटो समोर आले आहेत. लडाखमध्ये भारत-चीन सीमारेषेवर चीन आपलं सैन्य वाढवत असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे पूर्व लडाखमध्ये संघर्ष वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय सैन्यही हाय अलर्टवर असून चीनच्या हालचालींवर करडी नजर ठेवली जात आहे. पूर्व लडाखमधील पैंगोग सरोवर परिसरात पुन्हा घुसखोरी करून ‘जैसे थे’ परिस्थिती बदलण्याचा चिनी लष्कराचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला, अशी माहिती सैन्याने दिली. मात्र चिनी लष्कराने केलेल्या या प्रयत्नामध्ये भारतीय सैन्याला येथील महत्वाच्या भूप्रदेशावर ताबा मिळवण्यात यश आलं आहे. हे वाचा-हवा आणि जमीनच नाही तर समुद्रातही चीनची दादागिरी रोखणार, असा आहे भारताचा प्लॅन सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय सैन्याच्या विशेष दलाने या भागावर चिनी लष्कराला धोबीपछाड देत ताबा मिळवला. उंचीवर असणारा हा प्रदेश युद्धाच्या दृष्टीने अंत्यंत महत्त्वाचा मानला जात असून या प्रदेशाचा ताबा असणाऱ्याला शत्रूवर सहज नजर ठेवता येणार आहे. 29 आणि 30 ऑगस्टच्या रात्री झालेल्या संघर्षानंतर भारताने हा प्रदेश ताब्यात घेतला. या ठिकाणाहून अवघ्या काही शे मिटर अंतरावर चिनी लष्कर असून त्यांच्यावर नजर ठेवणे अधिक सोपे झाले आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या